मी नेहमीच जोखीम घेण्यावर भर देतो - पंतप्रधान
नवी दिल्ली , 16 जानेवारी (हिं.स.)।“मी नेहमीच जोखीम घेण्यावर भर देत आलो आहे, कारण ती माझीही जुनी सवय आहे,”असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.ते आज, शुक्रवारी स्टार्टअप इंडिया मोहिमेच्या 10 वर्षांच्या पूर्तीनिमित्त उद्योजक आणि स्टेकहोल्डर्सना
मी नेहमीच जोखीम घेण्यावर भर देत आलो आहे, कारण ती माझीही जुनी सवय आहे - पंतप्रधान


नवी दिल्ली , 16 जानेवारी (हिं.स.)।“मी नेहमीच जोखीम घेण्यावर भर देत आलो आहे, कारण ती माझीही जुनी सवय आहे,”असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.ते आज, शुक्रवारी स्टार्टअप इंडिया मोहिमेच्या 10 वर्षांच्या पूर्तीनिमित्त उद्योजक आणि स्टेकहोल्डर्सना संबोधित करताना बोलत होते. या वेळी पंतप्रधान मोदी यांनी गेल्या दशकात भारताच्या स्टार्टअप इकोसिस्टममध्ये झालेल्या परिवर्तनांचा आढावा घेतला. त्यांनी स्टार्टअप इंडिया मोहिमेला आत्मविश्वास, नव्या कल्पना आणि जोखीम घेण्याबाबत बदलत चाललेल्या सामाजिक मानसिकतेतून उभी राहिलेली एक क्रांती असे संबोधले.

स्टार्टअप इंडियाच्या दहा वर्षांबाबत बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “जे काम करण्यास कोणीही तयार नसते, ज्या कामांना दशकानुदशके आधीच्या सरकारांनी हात लावला नाही—कारण त्यामध्ये निवडणूक हरण्याची आणि सत्तेची खुर्ची जाण्याची भीती होती—ती कामे मी माझे कर्तव्य समजून करतो.”

ते पुढे म्हणाले, “तुमच्याप्रमाणेच माझाही विश्वास आहे की जे काम देशासाठी आवश्यक आहे, ते कोणाला तरी करावेच लागते. कोणाला तरी जोखीम घ्यावीच लागते. नुकसान झाले तर ते माझे असेल, आणि फायदा झाला तर तो माझ्या देशवासीयांचा असेल.”

पंतप्रधानांनी सांगितले की, एक दशकापूर्वी भारतात नवकल्पनांच्या संधी अत्यंत मर्यादित होत्या; मात्र आज स्टार्टअप इंडिया ही एक राष्ट्रव्यापी चळवळ बनली आहे. त्यांनी नमूद केले की दहा वर्षांपूर्वी देशात सुमारे 500 स्टार्टअप्स होते, तर आज ही संख्या वाढून 2 लाखांहून अधिक झाली आहे.

स्टार्टअप इंडिया उपक्रमाची सुरुवात 16 जानेवारी 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती. नवकल्पनांना प्रोत्साहन देणे, उद्योजकतेला चालना देणे आणि गुंतवणूकाधारित विकासाला सक्षम करणे हा या राष्ट्रीय कार्यक्रमाचा उद्देश होता. भारताला नोकरी शोधणारा देश न बनवता नोकरी देणारा देश बनवणे, हे या मोहिमेचे मुख्य ध्येय आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande