निवडून येताच ठाकरेंच्या नगरसेवकाने केला 'लोटांगण' संकल्प पूर्ण
अकोला, 17 जानेवारी (हिं.स.)। निवडणूक जिंकल्यानंतर जल्लोष होणं साहजिकच असतं, मात्र त्याहीपेक्षा महत्त्वाचं असतं ते जनतेप्रती कृतज्ञता व्यक्त करणं. अशीच एक भावनिक आणि श्रद्धेने ओतप्रोत भरलेली घटना अकोला महापालिका निवडणुकीत पाहायला मिळाली आहे.अकोला मह
Photo


अकोला, 17 जानेवारी (हिं.स.)। निवडणूक जिंकल्यानंतर जल्लोष होणं साहजिकच असतं, मात्र त्याहीपेक्षा महत्त्वाचं असतं ते जनतेप्रती कृतज्ञता व्यक्त करणं. अशीच एक भावनिक आणि श्रद्धेने ओतप्रोत भरलेली घटना अकोला महापालिका निवडणुकीत पाहायला मिळाली आहे.अकोला महापालिकेच्या निवडणुकीत उबाठा गटाचे उमेदवार सागर भारुका यांनी भाजपच्या उमेदवाराचा पराभव करत प्रभाग क्रमांक १२ मधून दणदणीत विजय मिळवला. हा विजय साजरा करताना त्यांनी केवळ जल्लोषावर भर न देता, थेट देवाच्या आणि मतदारांच्या चरणी नतमस्तक होत आपली कृतज्ञता व्यक्त केली.

देवाच्या आणि जनतेच्या आशीर्वादामुळेच आपण निवडून आलो आहोत, अशी भावना व्यक्त करत सागर भारुका यांनी आपल्या घरापासून सुमारे २ किलोमीटर अंतरावर असलेल्या खाटू श्याम बाबा मंदिरापर्यंत लोटांगण घालत दर्शन घेतले. रस्त्यातून जाताना त्यांचा हा भावनिक प्रवास पाहून अनेक नागरिकांच्या डोळ्यांतही आपसूकच भावनांचे पाणी तरळले.या वेळी सागर भारुका यांनी मतदारांचे मनापासून आभार मानत, आगामी काळात जनतेला दिलेली सर्व आश्वासनं प्रामाणिकपणे पूर्ण करण्याची ग्वाही दिली. सत्ता नव्हे तर सेवा हेच आपलं ध्येय असल्याचं त्यांनी यावेळी ठामपणे सांगितलं.श्रद्धा, नम्रता आणि जनतेप्रती कृतज्ञता यांचा सुंदर संगम असलेली ही घटना सध्या अकोल्यात चर्चेचा विषय ठरत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande