
परभणी, 17 जानेवारी (हिं.स.)।
पाथरी तालुक्यातील विकास कामांच्या जोरावर निश्चितपणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेला यश मिळेल अशी ग्वाही शिवसेना अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेशाध्यक्ष सईद खान यांनी सांगितले.
शिवसेना पक्षामध्ये जाहीर पक्षप्रवेश!
झरी येथील माजी सरपंच श्री. चंद्रहंस सत्वधर यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह खान यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.सामाजिक क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव, जनतेशी असलेली घट्ट नाळ आणि कार्यक्षम नेतृत्वाच्या जोरावर त्यांनी आजवर उल्लेखनीय कार्य केले आहे.या अनुभवी नेतृत्वाच्या प्रवेशामुळे शिवसेना पक्षाला निश्चितच नवी ताकद, ऊर्जा आणि संघटनात्मक बळ मिळाले असून आगामी काळात पक्ष अधिक मजबूत होईल, असा विश्वास व्यक्त करतो, असे त्यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis