बीड - धार्मिक स्थळांसाठी ध्वनिक्षेपकासाठी परवाना अनिवार्य
बीड, 17 जानेवारी, (हिं.स.)। सर्वोच्च न्यायालयाचे आदेश व गृहविभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, केज तालुक्यातील सर्व धार्मिक स्थळांना ध्वनिक्षेपक (लाऊडस्पीकर) परवाना घेणे बंधनकारक केले आहे. या मोहिमेला प्रतिसाद देत शिक्षक कॉलनी येथील विविध मंदिरांच्य
बीड - धार्मिक स्थळांसाठी ध्वनिक्षेपकासाठी परवाना अनिवार्य


बीड, 17 जानेवारी, (हिं.स.)। सर्वोच्च न्यायालयाचे आदेश व गृहविभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, केज तालुक्यातील सर्व धार्मिक स्थळांना ध्वनिक्षेपक (लाऊडस्पीकर) परवाना घेणे बंधनकारक केले आहे. या मोहिमेला प्रतिसाद देत शिक्षक कॉलनी येथील विविध मंदिरांच्या वतीने अधिकृत परवाना घेण्यात आले.

आवाजाची मर्यादा आणि वेळेचे भान राखण्यासाठी परवाना असणे आवश्यक आहे. हा परवाना विशिष्ट अटी आणि शर्तीसह देण्यात आला आहे. शहरातील व तालुक्यातील इतर सर्व धार्मिक स्थळांनी, मंडळांनी कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी तातडीने पोलीस ठाण्याशी संपर्क साधून आपले परवाने मिळवून घ्यावेत, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे. दरम्यान, शिक्षक कॉलनीतील हनुमान मंदिर, दत्त मंदिर, विठ्ठल-रूखमाई मंदिर

आणि महादेव मंदिर या देवस्थानांसाठीचा अधिकृत लाऊडस्पीकर परवाना केज पोलीस ठाण्यातून देण्यात आला आहे. यावेळी सहाय्यक पोलीस

निरीक्षक संदीप मांजरमे, गुप्त वार्ता विभागाचे शिवाजी कागदे यांच्या हस्ते हा परवाना प्रकाश मुंडे, वैभव धस, वैभव केंद्रे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.

कायद्याचे पालन करून धार्मिक उत्सव आणि दैनंदिन विधी साजरे करणे ही सर्वांची जबाबदारी आहे. शिक्षक कॉलनीतील विविध मंदिर समितीने परवाना घेतला असून ज्यांनी परवाने घेतले नाहीत. त्यांनी परवाने काढून घ्यावेत असे आवाहन पोलिसांनी केले आहे

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande