
परभणी, 17 जानेवारी (हिं.स.)।
धार फाटा ते आडगाव फाटा या मार्गावरील रस्त्याचे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे, ज्यामुळे स्थानिक नागरिकांना तसेच प्रवाशांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. परभणी आगाराची परभणी - सोरजा बस, खराब रस्त्याचे कारण पुढे करत बस आडगाव फाट्यावरून परत जात आहे. यामुळे विद्यार्थी, ग्रामस्थांना पायपीट करावी लागत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
परभणी आगाराची परभणी दुधगाव, आसेगाव, आडगाव बाजारमार्गे , सोरजा बस दररोज सकाळी ८ वाजता सुटून दुपारी २ वाजता सोरजा येथे पोहोचते. या मार्गावरील विविध गावांमधून ग्रामस्थ, विद्यार्थी, महिला एसटीने ये-जा करतात. मात्र, मागील काही
दिवसांपासून आडगाव फाटा ते धार फाटा रस्त्याचे काम संथ गतीने सुरू आहे. या कामाचा वाहतुकीवर परिणाम होत आहे. परभणी सरोजा बस आडगाव फाट्यापर्यत येत असून, पुढील प्रवास रस्त्याचे कारण सांगून माघारी फिरत आहे. यामुळे सोरजा येथील विद्यार्थ्यांना पाच ते सहा किमी पायपीट करून शाळा गाठावे लागत आहे. यामुळे विद्यार्थी, पालकांमधून नाराजी व्यक्त होत असून, याकडे आगर प्रमुखांनी लक्ष देऊन बस पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis