
परभणी, 17 जानेवारी, (हिं.स.)। पाथरी नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नगरपरिषदेत विविध महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची निवड प्रक्रिया यशस्वीपणे व सर्वानुमते पार पडली. या निवड प्रक्रियेत उपनगराध्यक्ष पदासाठी श्री. आलोक चौधरी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीमुळे नगरपरिषद प्रशासनाला एक अनुभवी, सक्षम व समन्वय साधणारे नेतृत्व लाभले आहे. तसेच नामनिर्देशित सदस्य पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून श्री. मोईज मास्टर अन्सारी यांची निवड करण्यात आली.
सामाजिक कार्याची जाण, जनसंपर्क आणि शहराच्या प्रश्नांबाबतची त्यांची भूमिका लक्षात घेता त्यांच्या निवडीमुळे नगरपरिषदेत सकारात्मक योगदान मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. या दोन्ही निवड ही पाथरी शहराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असून, त्यांच्या अनुभवाचा आणि कार्यक्षमतेचा लाभ शहराच्या विकासासाठी नक्कीच होईल, असे सांगण्यात आले.
नवनिर्वाचित व नामनिर्देशित सदस्यांनी परस्पर समन्वय ठेवत, नगरपरिषदेतील सर्व पदाधिकारी व कर्मचाऱ्यांसोबत एकत्रितपणे काम करून पाथरी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव प्रयत्नशील राहावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis