
जळगाव, 02 जानेवारी (हिं.स.) सहकारी संस्थाशी संबंधित तक्रारींच्या निवारणासाठी जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, जळगाव यांच्या वतीने दरमहा जिल्हास्तरीय लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो. लोकशाही दिन जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. जळगाव प्रशिक्षण सभागृह, गणेश कॉलनी शाखा, जळगाव येथे आयोजित केला जातो. मात्र, सध्या जळगाव शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू असल्याने सोमवार, दिनांक ५ जानेवारी २०२६ रोजी होणारा लोकशाही दिन रद्द करण्यात आला आहे, याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक धर्मराज पाटील यांनी दिली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर