जळगाव - भाजपचा चौथा तर शिंदे सेनेचा पाचवा उमेदवार बिनविरोध
जळगाव , 02 जानेवारी (हिं.स.) जळगाव महापालिकेत महायुतीची गाडी सुसाट असून अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी दुपारी अडीच वाजेपर्यंत महायुतीच्या ९ उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहेत. यामध्ये भाजपच्या ४ तर शिवसेना शिंदे गटाच्या ५ उमेदवाराचा समावेश आहे. जळ
जळगाव - भाजपचा चौथा तर शिंदे सेनेचा पाचवा उमेदवार बिनविरोध


जळगाव , 02 जानेवारी (हिं.स.) जळगाव महापालिकेत महायुतीची गाडी सुसाट असून अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी दुपारी अडीच वाजेपर्यंत महायुतीच्या ९ उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहेत. यामध्ये भाजपच्या ४ तर शिवसेना शिंदे गटाच्या ५ उमेदवाराचा समावेश आहे. जळगाव महापालिकेच्या ७५ जागांसाठी शेकडो उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. या निवडणुकीसाठी अर्ज छाननीनंतर आज माघारी घेण्याची अंतिम मुदत आहे. अर्ज छाननीच्या दिवशी जळगाव महापालिकेत भाजपने आपलं पाहिलं खाते उघडलं होते. बुधवारी भाजपच्या उज्ज्वला बेंडाळे यांची बिनविरोध निवड झाली होती. काल गुरुवारी शिवसेना शिंदे गटाच्या तीन जागा बिनविरोध झाल्या होत्या. यात प्रभाग क्रमांक 18-अ मधून शिवसेना आमदार चंद्रकांत सोनवणे यांचे चिरंजीव डॉ गौरव चंद्रकांत सोनवणे यांची, प्रभाग क्रमांक ९ अ मधून मनोज चौधरी, प्रभाग 9 ‘ब’ मधून प्रतिभा देशमुख यांचा समावेश होता. यानंतर आज शुक्रवारी सकाळी १९ अ मधून रेखा चुडामण पाटील यांची बिनविरोध निवड निश्चित झाली. त्यानंतर दुपारी भाजपचे उमेदवार आणि आमदार राजूमामा भोळे यांचे चिरंजीव विशाल भोळे यांची प्रभाग ७ क मधून बिनविरोध निवड झाली. यानंतर शिवसेनेचे सागर शामकांत सोनवणे यांची प्रभाग २ अ मधून, तर भाजपच्या दीपमाला कुंदन काळे या ७ अ मधून व प्रभाग १६ अ मधून डॉ विरण खडके यांची बिनविरोध निवड झाली आहे. दरम्यान जळगाव महापालिकेत आतापर्यंत महायुतीच्या ९ उमेदवारांची बिनविरोध झाली असून यामध्ये भाजपच्या ४ आणि शिवसेना शिंदे गटाच्या ५ उमेदवारांचा समावेश आहे. महायुतीमधील बिनविरोध झालेल्या उमेदवारांच्या समर्थकांनी जल्लोष केला.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande