राजेशाहीचा खरा इतिहास सर्वांनी जाणून घेणे आवश्यक -राम पुनयानी
छत्रपती संभाजीनगर, 21 जानेवारी (हिं.स.)। भारतामध्ये जाती व धर्माच्या भिंती उभारून हिंसा व संघर्ष उभारला जात आहे. परंतु, भारतीय संस्कृतीचा मुळ गाभा सहिष्णुता हाच आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध लेखक आणि विचारवंत प्रा. राम पुनियानी यांनी केले. ''विवेका
राजेशाहीचा खरा इतिहास सर्वांनी जाणून घेणे आवश्यक -राम पुनयानी


छत्रपती संभाजीनगर, 21 जानेवारी (हिं.स.)।

भारतामध्ये जाती व धर्माच्या भिंती उभारून हिंसा व संघर्ष उभारला जात आहे. परंतु, भारतीय संस्कृतीचा मुळ गाभा सहिष्णुता हाच आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध लेखक आणि विचारवंत प्रा. राम पुनियानी यांनी केले. 'विवेकानंद व्याख्यानमाला'त ते बोलत होते.

विवेकानंद कला, सरदार दलिपसिंग वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातर्फे पंढरीनाथ पाटील (भाऊ) ढाकेफळकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ 'विवेकानंद व्याख्यानमाला' आयोजित करण्यात आली आहे.

व्यासपीठावर संस्थेचे कोषाध्यक्ष तुषार शिसोदे होते. 'सहिष्णुतेतून संवाद, संवादातून लोकशाही' विषयावर पुढे प्रा. पुनियानी म्हणाले, जुन्या काळामध्ये राजा किंवा बादशहा जरी हिंदू- मुस्लिम असले तरीही त्या काळात धार्मिक सलोखा अस्तित्वात होता. राजेशाहीने धर्मासाठी नाही तर सत्ता व संपत्तीसाठी संघर्ष केल्याचा खरा इतिहास आहे. राजेशाहीचा खरा इतिहास सर्वांनी जाणून घेणे आवश्यक आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी, महात्मा जोतिबा फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अशा महापुरूषांचा वारसा आपल्या देशाला लाभाला आहे. अशा देशात आज अर्धसत्य माहितीच्या आधारावर असहिष्णू समाजाचा धोका निर्माण झाला आहे. एखाद्या समाजाबाबत जेव्हा गैरसमज किंवा अपप्रचार पसरवला जातो तेथेच असहिष्णुतेचा जन्म होतो. यातून अंतिमतः लोकशाहीलाच हरताळ फासला जाण्याची शक्यता असते. अशावेळी असहिष्णुतेचा सामना करणे आपले प्रत्येकाचे कर्तव्य आहे. लोकशाही संवाद व सहिष्णुतेच्या माध्यमातून बळकट करायची असेल तर भारतीय संविधानाची मूल्य अंगीकार केल्याशिवाय पर्याय नाही.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande