
छत्रपती संभाजीनगर, 21 जानेवारी (हिं.स.)। छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडी एकत्र येण्याची चिन्हे आहेत या संदर्भात लवकरच घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. एकत्र निवडणूक लढविण्याबाबत वंचित बहुजन आघाडीची चर्चा सुरू आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक एकत्रित लढविण्यावर महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीचे एकमत झाले आहे. गट आणि गणनिहाय जागा वाटप झाले असून जाहीर घोषणा करण्यात येणार आहेत.
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी महाविकास आघाडीसोबत एकत्र निवडणूक लढविण्याबाबत वंचित बहुजन आघाडीची चर्चा सुरू आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, बाळासाहेब थोरात, अशोक शिंदे, सचिन तायडे, काँग्रेसचे जगन्नाथ काळे, किरण पाटील, विश्वास औताडे, वंचित बहुजन आघाडीचे अमित भुईगळ, योगेश बन, अंजन साळवे यांच्यात सविस्तर चर्चा झाली. जिल्ह्यातील तालुकानिहाय गट आणि गणावर मते जाणून घेण्यात आली. स्थानिक परिस्थिती आणि पक्षनिहाय उमेदवारांच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. विरोधी पक्षाच्या करीत असलेल्या तयारीवर चर्चा झाली. दोन दिवस खलबते पार पडल्यानंतर जागा वाटप निश्चित झाले आहे. राजकीय अस्थिरता असल्यामुळे 'वंचित'चे उमेदवार साशंक असून त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis