नागपूर टी-20 सामन्यात भारताची न्यूझीलंडवर 48 धावांनी मात
टीम इंडियाची 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेत १-० ने आघाडीअभिषेक शर्माचे झंझावती अर्धशतक नागपूर, 21 जानेवारी (हिं.स.)भारताने पहिल्या टी-२० सामन्यात न्यूझीलंडचा ४८ धावांनी पराभव करत पाच सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. बुधवारी नागपूरच्या विदर
अभिषेक शर्मा


टीम इंडियाची 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेत १-० ने आघाडीअभिषेक शर्माचे झंझावती अर्धशतक

नागपूर, 21 जानेवारी (हिं.स.)भारताने पहिल्या टी-२० सामन्यात न्यूझीलंडचा ४८ धावांनी पराभव करत पाच सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. बुधवारी नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारताने अभिषेक शर्मा (८४) आणि रिंकू सिंग (४४*) यांच्या स्फोटक खेळींच्या जोरावर २० षटकांत ७ बाद २३८ धावा केल्या. टी-२० सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध भारताची ही सर्वोच्च धावसंख्या आहे. यापूर्वी २०२३ मध्ये भारताने न्यूझीलंडविरुद्ध २३४/४ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंडला आपल्या निर्धारित 20 षटकांत सात बाद केवळ १९० धावा करता आल्या. त्यांच्याकडून ग्लेन फिलिप्सने सर्वाधिक ७८ धावा केल्या. वरुण चक्रवर्ती आणि शिवम दुबे यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या, तर अर्शदीप सिंग, हार्दिक पंड्या आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

त्याआधी, अभिषेक शर्माच्या स्फोटक फलंदाजीमुळे भारताने २० षटकांत २३८ धावा केल्या. नाणेफेक गमावल्यानंतर आणि फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर, टीम इंडियाची सुरुवात खराब झाली होती. संजू सॅमसन आणि इशान किशन भारताची धावसंख्या 27 असतानांचा बाद झाले. पण अभिषेकने धमाकेदार खेळी केली. त्याने कर्णधार सूर्यकुमार यादवबरोबर ९९ धावांची भागीदारी करून भारताला मजबूत स्थितीत आणले. अभिषेक आपल्या शतकापासून दूर राहिला, त्याने ३५ चेंडूत ५ चौकार आणि ८ षटकारांसह ८४ धावा केल्या. कर्णधार सूर्यकुमार ३२ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यानंतर भारताने लवकर विकेट गमावल्या. पण नंतर डेथ ओव्हर्समध्ये रिंकू सिंगची स्फोटक कामगिरी महत्त्वपूर्ण ठरली. फिनिशर रिंकू सिंगने २० चेंडूत नाबाद ४४ धावा केल्या. आणि टीम इंडियाच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande