अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी व्हान्स यांच्या घरावर हल्ला, संशयित ताब्यात
वॉशिंग्टन , 05 जानेवारी (हिं.स.)। अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वेंस यांच्या घरावर हल्ला झाल्याची बातमी समोर आली आहे. ओहायोमध्ये असलेल्या जेडी व्हॅन्स यांच्या घराच्या खिडक्या फुटल्या असून, त्याचे फोटोही समोर आले आहेत. या प्रकरणी एका व्यक्तीला ताब्य
अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी व्हान्स यांच्या घरावर हल्ला, संशयित ताब्यात


वॉशिंग्टन , 05 जानेवारी (हिं.स.)। अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वेंस यांच्या घरावर हल्ला झाल्याची बातमी समोर आली आहे. ओहायोमध्ये असलेल्या जेडी व्हॅन्स यांच्या घराच्या खिडक्या फुटल्या असून, त्याचे फोटोही समोर आले आहेत. या प्रकरणी एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले असून हा हल्ला कोणी आणि का केला, याचा तपास सध्या सुरू आहे.

अमेरिकन माध्यमांच्या वृत्तानुसार, ओहायोमधील उपराष्ट्रपती जेडी वेंस यांच्या निवासस्थानी घडलेल्या या घटनेनंतर एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. माहितीनुसार, घटनेच्या वेळी उपराष्ट्रपतींचे कुटुंब घरात उपस्थित नव्हते आणि हल्लेखोराने घरात प्रवेश केला नसावा, असा अधिकाऱ्यांचा अंदाज आहे.

घटनास्थळावरून मिळालेल्या छायाचित्रांमध्ये उपराष्ट्रपतींच्या घराच्या खिडक्या फुटलेल्या स्पष्टपणे दिसत आहेत. मात्र, प्रत्यक्षात नेमके काय घडले याबाबत अद्याप स्पष्टता नाही. एका पोलिस अधिकाऱ्याच्या हवाल्याने सांगितले आहे की, हल्लेखोराने जेडी वेंस किंवा त्यांच्या कुटुंबीयांनाच लक्ष्य केले होते का, याची चौकशी सुरू आहे.

माध्यमांच्या माहितीनुसार, जेडी वेंस गेल्या एक आठवड्यापासून सिनसिनाटीमध्ये होते, मात्र रविवारी दुपारी ते शहरातून रवाना झाले. ज्या घरावर हल्ला झाला आहे, ते घर त्यांनी सुमारे १४ लाख डॉलर्स खर्चून खरेदी केले असून, हे घर सुमारे २.३ एकर क्षेत्रफळावर पसरलेले आहे.

उल्लेखनीय म्हणजे, वेनेझुएलावर अमेरिकेने केलेल्या लष्करी कारवाईनंतर अमेरिका तसेच जगभरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. अमेरिकेतही अनेकांनी या कारवाईचा निषेध करत आंदोलन केले आहे. मात्र उपराष्ट्रपती जेडी वेंस यांनी अमेरिकेच्या कारवाईचे समर्थन केले होते. अशा परिस्थितीत त्यांच्या घरावर झालेला हा हल्ला कोणाच्या व कोणत्या उद्देशाने केला, याबाबतची माहिती अद्याप प्रतीक्षेत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande