
ढाका , 05 जानेवारी (हिं.स.)।बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाहीत. अलीकडील काही दिवसांत चार हिंदूंच्या हत्येनंतर आता एका हिंदू विधवा महिलेवरील अमानुष अत्याचाराचा प्रकार समोर आला आहे. ही घटना झेनैदाह जिल्ह्यातील कालिगंज तालुक्यातील नादिपारा परिसरात घडली.
माहितीनुसार, येथील दोन स्थानिक गुंडांनी ४० वर्षीय हिंदू विधवा महिलेशी अत्याचार केला आणि त्यानंतर तिला झाडाला बांधून तिचे केस कापले. एवढेच नव्हे, तर आरोपींनी या घटनेचा व्हिडिओ तयार करून तो सोशल मीडियावर व्हायरल केला. या घटनेनंतर महिला बेशुद्ध पडली. स्थानिक नागरिकांनी तिला बेशुद्ध अवस्थेत जवळच्या रुग्णालयात दाखल केले. नंतर महिलेने शाहीन आणि त्याच्या एका साथीदाराविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
माहितीनुसार, सुमारे अडीच वर्षांपूर्वी महिलेने शाहीन आणि त्याच्या भावाकडून २० लाख रुपयांना ३ डेसिमल जमीन आणि दोन मजली घर खरेदी केले होते. त्यानंतरपासूनच शाहीनची त्या महिलेकडे वाईट नजर होती. यापूर्वीही त्याने अनेक वेळा तिच्याशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला होता.महिलेने त्याच्या प्रस्तावाला नकार दिल्यानंतर शाहीनने वेगवेगळ्या प्रकारे तिला त्रास देण्यास सुरुवात केली. शनिवारी सायंकाळी महिलेच्या घरी दोन नातेवाईक आले असताना शाहीन आणि त्याचा साथीदार हसन जबरदस्तीने घरात घुसले आणि त्या विधवेवर अत्याचार केला, असा आरोप आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode