सिंधू जल करारावर भारताला पाणी रोखण्याचा अधिकार नाही- पाक आयुक्त
इस्लामाबाद , 05 जानेवारी (हिं.स.)। पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या हल्ल्यानंतर भारताने सिंधू जल करार स्थगित केला होता. तेव्हापासून पाकिस्तान वारंवार या मुद्द्यावर नाराजी व्यक्त करत आहे.भारतातून पाकिस्तानकडे जाणाऱ्या नद्यांमधील पाण्याच्या उपलब्धतेत
सिंधू जल करारावर भारताला पाणी रोखण्याचा अधिकार नाही- पाक आयुक्त


इस्लामाबाद , 05 जानेवारी (हिं.स.)। पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या हल्ल्यानंतर भारताने सिंधू जल करार स्थगित केला होता. तेव्हापासून पाकिस्तान वारंवार या मुद्द्यावर नाराजी व्यक्त करत आहे.भारतातून पाकिस्तानकडे जाणाऱ्या नद्यांमधील पाण्याच्या उपलब्धतेत घट झाल्याने पाकिस्तानमध्ये संकटाची परिस्थिती निर्माण झाली असून, तो सातत्याने यावर आक्षेप घेत आहे.आता सिंधू जल विषयक पाकिस्तानचे आयुक्त सैयद मुहम्मद मेहर अली शाह यांनी रविवारी, 4 जानेवारी रोजी सांगितले की, भारताने सिंधू जल करार “स्थगित” ठेवल्याचा दावा करण्यास कोणताही आंतरराष्ट्रीय कायदेशीर आधार नाही. त्यांच्या मते, हा करार आंतरराष्ट्रीय कायद्याअंतर्गत पूर्णतः लागू आहे.

पाकिस्तानी वृत्तवाहिनीवरील एका कार्यक्रमात बोलताना सैयद मुहम्मद मेहर शाह म्हणाले, “करार स्थगित ठेवण्याच्या मुद्द्यावर बोलायचे झाल्यास, ‘स्थगन’ हा शब्द आंतरराष्ट्रीय करार कायद्यात मान्य नाही. हा एक बनवलेला शब्द आहे, कारण भारताला हे माहीत आहे की तो हा करार निलंबित, रद्द किंवा समाप्त करू शकत नाही. म्हणूनच हा शब्द वापरण्यात आला आहे.” ते पुढे म्हणाले, “या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी पाकिस्तान सावधपणे पावले टाकत असून, उचलले जाणारे सर्व उपाय औपचारिक स्वरूपाचे आहेत.”

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानच्या वाट्याचे पाणी रोखण्याबाबत दिलेल्या इशाऱ्यावर प्रतिक्रिया देताना शाह म्हणाले, “पाकिस्तानचे पाणी पूर्णतः किंवा अंशतः रोखण्यास कोणतीही जागा नाही. हे नैतिकतेच्या दृष्टीनेही अयोग्य आहे.”

शाह यांनी असेही सांगितले की, “आतापर्यंत चेनाब, झेलम आणि सिंधू नद्यांमध्ये नैसर्गिक पद्धतीने पाणी वाहत होते. मात्र, 24 एप्रिल 2025 नंतर भारताने तीन वेळा असे प्रकार केले—मे महिन्यात दोनदा आणि डिसेंबरमध्ये एकदा—ज्यात पाण्याचा प्रवाह आधी वाढवण्यात आला आणि नंतर काही दिवसांसाठी तो कमी करण्यात आला.”

एप्रिल 2025 मध्ये पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने सिंधू जल करार स्थगित केला होता. त्यानंतर पाकिस्तानने जलवाटप निलंबित करण्याच्या कोणत्याही प्रयत्नाला “युद्धाची कृती” असे संबोधले होते. मात्र, भारताने स्पष्टपणे सांगितले होते की “रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही.” अलीकडेच भारताने काश्मीरमधील चेनाब नदीवरील 260 मेगावॅट क्षमतेच्या दुलहस्ती टप्पा-दोन जलविद्युत प्रकल्पाला मंजुरी दिली असून, त्यामुळे पाकिस्तान अधिकच अस्वस्थ झाला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande