श्रेयस अय्यरकडे विजय हजारे ट्रॉफीच्या उर्वरित सामन्यांसाठी मुंबई संघाचे नेतृत्व
नवी दिल्ली, 05 जानेवारी (हिं.स.)दुखापतीतून परतणारा श्रेयस अय्यर विजय हजारे ट्रॉफीच्या उर्वरित सामन्यांसाठी मुंबई संघाचे नेतृत्व करणार आहे. दुखापतीमुळे शार्दुल ठाकूर अनुपलब्ध असेल. ज्यामुळे श्रेयसची नियुक्ती करण्यात आली आहे. श्रेयस मुंबई संघात सामी
श्रेयस अय्यर


नवी दिल्ली, 05 जानेवारी (हिं.स.)दुखापतीतून परतणारा श्रेयस अय्यर विजय हजारे ट्रॉफीच्या उर्वरित सामन्यांसाठी मुंबई संघाचे नेतृत्व करणार आहे. दुखापतीमुळे शार्दुल ठाकूर अनुपलब्ध असेल. ज्यामुळे श्रेयसची नियुक्ती करण्यात आली आहे. श्रेयस मुंबई संघात सामील झाला आणि प्रशिक्षक ओंकार साळवी आणि अतुल रानडे यांच्या देखरेखीखाली सराव सत्रात सहभागी झाला. या सत्रादरम्यान श्रेयस वेगवान गोलंदाजांविरुद्ध आरामदायी दिसला आणि त्याने काही कॅचिंग सरावही केला.

बीसीसीआयने नुकतीच ११ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली. या मालिकेसाठी श्रेयसचाही संघात समावेश करण्यात आला. पण श्रेयसचा सहभाग त्याच्या तंदुरुस्तीवर अवलंबून असेल. यापूर्वी श्रेयसने २ जानेवारी २०२६ रोजी त्याचा पहिला ५० षटकांचा रिटर्न टू प्ले (आरटीपी) यशस्वीरित्या पूर्ण केला होता आणि आता तो ६ जानेवारी रोजी विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळणार आहे.

श्रेयस अय्यरला विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळण्याची परवानगी देण्यात आली आहे. ऑक्टोबर २०२५ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेदरम्यान श्रेयसला दुखापत झाली होती. तो ६ जानेवारी रोजी हिमाचल प्रदेशविरुद्धच्या विजय हजारे ट्रॉफी सामन्यात मुंबईकडून खेळेल. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यादरम्यान क्षेत्ररक्षण करताना श्रेयसला दुखापत झाली होती आणि त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. श्रेयसने बंगळुरू येथील बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्स (सीओई) येथे त्याचे पुनर्वसन पूर्ण केले.

भारतीय टी२० कर्णधार सूर्यकुमार यादव देखील मुंबईकडून काही विजय हजारे ट्रॉफी सामने खेळू शकतो. असे मानले जाते की, सूर्यकुमार हिमाचल प्रदेश आणि पंजाबविरुद्धच्या सामन्यांमध्ये खेळू शकतो. दरम्यान, मुंबई निवडकर्त्यांनी सध्या भारतीय एकदिवसीय संघाचा उपकर्णधार असलेल्या श्रेयसकडे कर्णधारपद सोपवले आहे. शार्दुलला डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे. महाराष्ट्राविरुद्धच्या मागील सामन्यातून बाहेर पडलेला सरफराज खान हिमाचल प्रदेशविरुद्धच्या सामन्यातही सहभागी होऊ शकतो. दरम्यान, मुंबईने ऑफस्पिनर शशांक अत्तार्डेचाही संघात समावेश केला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande