ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेच्या बक्षीस रकमेत वाढ
नवी दिल्ली, 6 जानेवारी, (हिं.स.)वर्षातील पहिली ग्रँडस्लॅम असलेल्या ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेच्या बक्षीस रकमेत गेल्या वर्षीच्या तुलनेत १६ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. १८ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेसाठी विक्रमी पातळी गाठली आहे. ऑस्
ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस लोगो


नवी दिल्ली, 6 जानेवारी, (हिं.स.)वर्षातील पहिली ग्रँडस्लॅम असलेल्या ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेच्या बक्षीस रकमेत गेल्या वर्षीच्या तुलनेत १६ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. १८ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेसाठी विक्रमी पातळी गाठली आहे. ऑस्ट्रेलियन ओपन आयोजकांनी मंगळवारी स्थानिक चलनात आतापर्यंतची सर्वात मोठी बक्षीस रक्कम जाहीर केली. जी २०२६ साठी १११.५ दशलक्ष ऑस्ट्रेलियन डॉलर्स (७५ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स) निश्चित केली आहे.

२०२५ च्या बक्षीस रकमेच्या ९६.५ दशलक्ष ऑस्ट्रेलियन डॉलर्सपेक्षा ही १६ टक्के वाढ आहे. महिला आणि पुरुष एकेरी विजेत्यांना ४.१५ दशलक्ष ऑस्ट्रेलियन डॉलर्स (२.८ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स) मिळतील. जी गेल्या वर्षीपेक्षा १९ टक्के जास्त आहे. पात्रता स्पर्धेसाठी बक्षीस रकमेतही १६ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. मुख्य ड्रॉसाठी पात्र ठरणाऱ्या सर्व एकेरी आणि दुहेरी टेनिसपटूंना किमान १० टक्के वाढ मिळेल असेही आयोजकांचे म्हणणे आहे.

ही १६% वाढ प्रत्येक स्तरावर टेनिस कारकिर्दीला पाठिंबा देण्याच्या आमच्या वचनबद्धतेचे प्रदर्शन करते. २०२३ पासून पात्रता बक्षीस रकमेत ५५% वाढ करण्यापासून ते खेळाडूंच्या फायद्यांमध्ये वाढ करण्यापर्यंत आम्ही सर्व स्पर्धकांसाठी व्यावसायिक टेनिस शाश्वत राहण्याची खात्री करत आहोत, असे टेनिस ऑस्ट्रेलियाचे सीईओ क्रेग टिली म्हणाले.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande