
बॅनर फाडल्याने नागरिकांमध्ये प्रचंड रोष..
अकोला, 08 जानेवारी (हिं.स.)। अकोला शहरातील प्रभाग क्रमांक 14 आणि महापालिकेतील नवीन हद्दवाढीत असलेल्या शिवनी मधील 'बहुजन नगरात' येथे मतदानावरील बहिष्काराचे बॅनर अज्ञात व्यक्तीने फाटले आहे. ही घटना घडली असून नागरिकांचा प्रचंड रोष वाढवतो आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी बहुजन नगर परिसरात विकासात्मक कामे होत नसल्याचा आरोपावरून नागरिकांनी चक्क मतदानावर बहिष्कार टाकला. याबाबतचे होल्डिंग बॅनर मुख्य रस्त्यावर अकोला-शिवणी येथे लावले होते. मात्र अज्ञात व्यक्तींनी हे लावलेले बॅनर फाडून टाकले आहे. त्यामुळे प्रचंड रोष या परिसरातील नागरिकांकडून व्यक्त केला जातोय. परिसरातील इतर होर्डिंग बॅनर व्यवस्थित आहेत. मात्र आमचेच बॅनर का फाडले? असा अहवाल आता नागरिकांनी केला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे