अ‍ॅशेस मालिका जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलिया WTC क्रमवारीत अग्रस्थानी कायम
दुबई, 08 जानेवारी (हिं.स.)सिडनीमध्ये इंग्लंडला पराभूत करत ऑस्ट्रेलियाने आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (डब्ल्यूटीसी) २०२५-२७ च्या पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानावर आपली पकड मजबूत केली आहे. दुसरीकडे इंग्लंडची स्थिती भारतापेक्षा वाईट आहे. टीम इंडियास
ऑस्ट्रेलियाने अ‍ॅशेस ट्रॉफी कायम राखली


दुबई, 08 जानेवारी (हिं.स.)सिडनीमध्ये इंग्लंडला पराभूत करत ऑस्ट्रेलियाने आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (डब्ल्यूटीसी) २०२५-२७ च्या पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानावर आपली पकड मजबूत केली आहे. दुसरीकडे इंग्लंडची स्थिती भारतापेक्षा वाईट आहे. टीम इंडियासध्या सहाव्या स्थानावर आहे.

सिडनीमध्ये खेळल्या गेलेल्या पाचव्या आणि शेवटच्या अ‍ॅशेस कसोटीत ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला पाच विकेट्सने पराभूत करत मालिका ४-१ अशी जिंकली. इंग्लंडने १६० धावांचे लक्ष्य ठेवले होते. जे यजमानांनी पाचव्या दिवशी फक्त ३१.२ षटकांत साध्य केले. तत्पूर्वी, इंग्लंडने नाणेफेक जिंकून जो रूट (१६०) च्या शतकांमुळे पहिल्या डावात ३८४ धावा केल्या. प्रत्युत्तरात, ऑस्ट्रेलियाने ट्रॅव्हिस हेड (१६३) आणि स्टीव्ह स्मिथ (१३८) यांच्या शतकांमुळे ५६७ धावा केल्या आणि १८३ धावांची आघाडी घेतली. दुसऱ्या डावात जेकब बेथेल (१५४) च्या शतकानंतरही इंग्लंड ३४२ धावांतच गारद झाले आणि ऑस्ट्रेलियासमोर १६० धावांचे लक्ष्य राहिले.

सिडनीतील विजयानंतर, ऑस्ट्रेलियाने आठ पैकी सात सामने जिंकून ८७.५०% गुणांसह WTC २०२५-२७ चक्रात आपले अव्वल स्थान मजबूत केले आहे. त्यांचा मालिका फॉर्म देखील प्रभावी राहिला आहे, ज्यामुळे त्यांना WTC फायनलच्या शर्यतीत प्रवेश मिळाला आहे. संघाचा एकमेव पराभव अ‍ॅशेस मालिकेदरम्यान मेलबर्नमध्ये इंग्लंडविरुद्ध झाला होता.

सध्याच्या WTC चक्रात इंग्लंडचा ३१.६७% गुणांचा टक्केवारी आहे, १० सामन्यांपैकी तीन विजय आणि सहा पराभवांसह, आणि तो भारतापेक्षाही खाली सातव्या स्थानावर आहे. इंग्लंडचा अलिकडचा मालिका फॉर्म, चार पराभवांसह, संघाला कसोटी स्वरूपात लक्षणीय सुधारणा करण्याची आवश्यकता असल्याचे स्पष्टपणे दर्शवित आहे.

कसोटी क्रमवारीत भारत हा सर्वात मजबूत संघांपैकी एक मानला जात असला तरी, WTC २०२५-२७ मधील त्यांची कामगिरी आतापर्यंत तितकी प्रभावी राहिलेली नाही. भारत नऊ सामन्यांत चार विजय आणि चार पराभवांसह सहाव्या स्थानावर आहे आणि गुणांची टक्केवारी ४८.१५% आहे.

न्यूझीलंड ७७.७८% गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे.त्यांनी तीन पैकी दोन सामने जिंकले आहेत. दक्षिण आफ्रिका ७५% गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे, त्यांनी चार पैकी तीन सामने जिंकले आहेत. श्रीलंका आणि पाकिस्तान हे भारतापेक्षा वर आहेत. श्रीलंकेचा ६६.६७% गुणांचा टक्का आहे, तर पाकिस्तानचा ५०% गुणांचा टक्का आहे. बांगलादेश आणि वेस्ट इंडिज तळाशी संघर्ष करत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande