पंतप्रधान मोदींनी ट्रम्प यांना फोन न केल्याने भारत-अमेरिका व्यापार करार होऊ शकला नाही- हॉवर्ड लटनिक
वॉशिंग्टन, 09 जानेवारी (हिं.स.)।अमेरिकेचे वाणिज्य सचिव हॉवर्ड लटनिक यांनी भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार कराराबाबत मोठा दावा केला आहे. अमेरिकेच्या मंत्र्यांनी सांगितले की भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्
पंतप्रधान मोदींनी ट्रम्प यांना फोन न केल्याने भारत-अमेरिका व्यापार करार होऊ शकला नाही- हॉवर्ड लटनिक


वॉशिंग्टन, 09 जानेवारी (हिं.स.)।अमेरिकेचे वाणिज्य सचिव हॉवर्ड लटनिक यांनी भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार कराराबाबत मोठा दावा केला आहे. अमेरिकेच्या मंत्र्यांनी सांगितले की भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन केला नव्हता, त्यामुळे हा करार होऊ शकला नाही.

हॉवर्ड लटनिक यांनी एका मुलाखतीत म्हटले की, “थेट सांगायचे झाले तर हा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा करार होता. अंतिम निर्णय तेच घेतात. सर्व काही त्यांच्याच हातात असते. सगळे आधीच ठरले होते. यासाठी पंतप्रधान मोदींनी फक्त राष्ट्राध्यक्षांना फोन करणे आवश्यक होते. मात्र ते तसे करण्यास अस्वस्थ होते. पंतप्रधान मोदींनी फोन केला नाही, म्हणून करार झाला नाही.” लटनिक यांनी पुढे सांगितले की, “त्या शुक्रवारी जे घडले, त्यानंतरच्या आठवड्यात आम्ही इंडोनेशिया, फिलीपिन्स आणि व्हिएतनामसोबत अनेक करारांची घोषणा केली.”

जुलै २०२५ मध्ये अमेरिका आणि युरोपीय संघ, युनायटेड किंगडम, जपान, इंडोनेशिया, फिलीपिन्स, व्हिएतनाम आणि दक्षिण कोरिया यांच्यात टॅरिफसंदर्भात चर्चा सुरू होती. हॉवर्ड लटनिक यांच्या वक्तव्यांकडे पाहिले तर ज्या देशांनी अमेरिकेसोबत लवकर चर्चा पूर्ण करण्यास सहमती दर्शवली, त्यांच्यावर कमी टॅरिफ लावण्यात आला. मात्र त्या महिन्यात झालेले टॅरिफ करारांचे क्रम आणि संबंधित दर लटनिक यांच्या दाव्यांशी जुळत नाहीत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande