गोकुळच्या निवडणुकीत काँग्रेसकडून 'महायुती'ला जबर धक्का : क्रॉस वोटिंगमुळे महायुती हतबल
कोल्हापूर, 19 ऑक्टोबर (हिं.स.)। कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ (गोकुळ)च्या निवडणुकीमध्ये सत्तारूढ महायुतीच्या आघाडीला जबरदस्त धक्का बसला. 25 पैकी केवळ 12 जागा मिळवून महायुतीने गोकुळ मधील सत्ता गमावली. तर काँग्रेस प्रणित समविचारी आघाडीने 13 जागा
गोकुळ दूध संघ


कोल्हापूर, 19 ऑक्टोबर (हिं.स.)।

कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ (गोकुळ)च्या निवडणुकीमध्ये सत्तारूढ महायुतीच्या आघाडीला जबरदस्त धक्का बसला. 25 पैकी केवळ 12 जागा मिळवून महायुतीने गोकुळ मधील सत्ता गमावली. तर काँग्रेस प्रणित समविचारी आघाडीने 13 जागा मिळवून सत्ता हस्तगत केली. यामध्ये काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. सतेज पाटील यांनी नेतृत्वाचा कस लावून सत्तेची विजयश्री खेचून आणली. सर्वस्व पणाला लावलेले महायुतीतील घटक पक्षाचे जिल्हा पातळीवरील नेते आणि उमेदवार क्रॉस व्होटिंग पुढे हातबल झाले.

गोकुळ दूध संघाच्या झालेल्या निवडणुकीची मतमोजणी सकाळी आठ वाजता रमण मळा येथील बहुउद्देशीय हॉलमध्ये सुरू झाली. संचालक पदाच्या सर्वसाधारण २०, महिला 2, अनुसूचित जाती १, अनुसूचित जमाती१,आणि इतर मागासवर्गीय १ अशा २५ जागेसाठी सरळ लढत झाल्याने ५० उमेदवार रिंगणात होते. महायुतीच्या आघाडी कडून घटक पक्षातील नेत्यांनी दिलेल्या उमेदवारांमध्ये त्यांच्याच सग्यासोयऱ्यांचा भरणा होता. तर काँग्रेस आघाडीच्या पॅनलमध्ये गोकुळच्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना उमेदवारी दिली होती. ५४१८ पैकी ५४१६ जणांनी मतदानाचा हक्क बजावला होता. मतमोजणी सुरू झाल्यानंतर प्रथम सर्व मतपत्रिका पेटीतून गटनिहाय एकत्र करून मिसळून त्या मोजण्यात आल्या. महायुतीकडून जास्तीत जास्त ठरावधारक मतदार एकत्र करून त्यांना देवदर्शनाच्या नावाखाली सहलीला नेऊन 'पॅनल टू पॅनल' मतदानासाठी शपथ घेण्यास भाग पाडले होते. पण मोजणी सुरू झाल्यानंतर मात्र मतदानात 'क्रॉस वोटिंग' चे प्रमाण जास्त असल्याचे दिसून आले. त्यामुळे मतदानाची चुरस आणि निकालाची उत्सुकता शेवटपर्यंत वाढत गेली. महायुतीला मंत्री हसन मुश्रीफ यांचे सुपुत्र आणि गोकुळचे चेअरमनपद भूषविलेले नवीद मुश्रीफ, ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील (आबाजी), अरुण डोंगळे, शोमिका महाडिक यांचे पराभव धक्कादायक ठरले. गेल्यावेळी पराभवाला सामोरे गेलेले माजी खा. संजय मंडलिक यांचे पुत्र महायुतीचे उमेदवार ॲड. वीरेंद्र मंडलिक यांना सर्वात जास्त मते मिळाली. सत्ता महायुतीची येणार आणि काँग्रेस आघाडीला ५ ते ६ जागा मिळणार अशी जोरदार चर्चा असताना प्रत्यक्ष ठराधारक मतदारांनी क्रॉस व्होटींग करून थेट सत्ता परिवर्तनच केले. आणि आ. सतेज पाटील यांनी दिलेली एकाकी झुंज, प्रचाराचे योग्य मुद्दे, संपर्क, नियोजन आणि सहनुभूती याचा त्यांना फायदा झाला.

निकाल स्पष्ट होताच त्यांच्या समर्थकांनी मतमोजणी केंद्रापासून आ. पाटील यांच्या अजिंक्यतारा कार्यालयापर्यंत फटाक्याची अतिषबाजी, गुलालाची उधळण करीत घोषणेने परिसर दणाणून सोडत प्रचंड जल्लोष केला.

महायुतीचे तीन उमेदवार काही मताच्या फरकाने पराभूत झाल्यामुळे त्या उमेदवारांनी फेर मतमोजणीची मागणी केली. पराभूत उमेदवार शौमिका महाडिक यांनी फेर मतमोजणीची मागणी केली फेर मतमोजणीतही त्यांचा पराभव झाला.

पुन्हा निकाल प्रलंबित ठेवण्यात आला काँग्रेस आघाडीचे नेते सतेज पाटील हे पुन्हा थेट मतमोजणी केंद्रावर जाऊन त्यांनी ठाण मांडले तसेच निकाल देण्यास विलंब केल्याबद्दल निवडणूक अधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली. तरीही सुरवातीला महायुती ९ आणि काँग्रेस समविचारी १६ असे बलाबल असताना काठावर पराभूत झालेल्या तीन उमेदवारांनी फेर मतमोजणीची मागणी केली त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी मोसमी चौगुले यांनी निकाल प्रलंबित ठेवला. आणि फे मतमोजणी केल्यानंतर महायुती १२ आणि काँग्रेस समविचारी १३ असे बलाबल झाले.

तर दिग्गज उमेदवारांचा पराभवआणि सत्ता गेल्याने महायुतीच्या गोटात सन्नाटा पसरला. मतमोजणी केंद्रात असलेले नविद मुश्रीफ, विश्वास पाटील यांनीही निकालाचा कल लक्षात घेऊन काढता पाय घेतला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुणे विधानपरिषद शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवारांच्या प्रचाराचा प्रचारासाठी कोल्हापुरात आले होते. महायुतीचे नेते मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात आणि प्रचार मेळाव्यात व व्यस्त राहिले.

आघाडी आणि गटनिहाय विजयी उमेदवार असे -

आ. सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील

शाहू समविचारी आघाडी

: एकूण विजयी उमेदवार : १३

सर्वसाधारण गट (८ जागा)

1. अभिजित प्रभाकर तायशेटे

2. शशिकांत आनंदराव पाटील चुयेकर

3. किसन बापूसो चौगले

4. बाबासाहेब श्रीपती चौगले

5. राहुल बजरंग देसाई

6. विद्याधर बाबुराव गुरबे

7. बाबासाहेब विष्णू देवकर

8. विश्वजीत दिनकरराव जाधव

महिला राखीव गट (२ जागा)

9. अंजना केदारी रेडेकर

10. भाग्यश्री धीरज डोंगळे

इतर मागासवर्गीय गट (१ जागा)

11. शशिकांत शामराव खोत

अनुसूचित जाती गट (१ जागा)

12. राजू बाबा आवळे

भटक्या-विमुक्त जमाती गट (१ जागा)

13. बयाजी शेळके

महायुती आघाडी

एकूण विजयी उमेदवार : १२

सर्वसाधारण गट (१२ जागा)

1. राहुल पांडुरंग पाटील

2. चेतन अरुण नरके

3. अजित शशिकांत नरके

4. अंबरीषसिंह संजय घाटगे

5. विरेंद्र संजय मंडलिक

6. मदन बाबुराव देसाई

7. राजेश नरसिंगराव पाटील

8. रणजितसिंह दिलीपराव पाटील

9. रणजितसिंह कृष्णराव पाटील

10. अजित पांडुरंग पाटील

11. कर्णसिंह गायकवाड

12. अमर पाटील (कोडोली)

-----------------------

---------------

हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar


 rajesh pande