अनिल कपूर यांच्या शिरपेचात मानाचा तुरा; ‘सुबेदार’साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचे नामांकन
मुंबई, 02 ऑक्टोबर (हिं.स.)। हिंदी सिनेमाची नव्याने व्याख्या करत चार दशके पूर्ण केल्यानंतरही मेगास्टार अनिल कपूर आजही तितकेच चर्चेत आहेत. जागतिक स्तरावर भारतीय ध्वज उंच फडकवत आहेत. सुभेदार या सिनेमाच्या दिग्गज अभिनेत्याला सुरेश त्रिवेणी यांच्या ॲक्श
सुबेदारसाठी एशियन अकॅडमी क्रिएटिव्ह अवॉर्ड्समध्ये मेगास्टार अनिल कपूर यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचे नामांकन !


मुंबई, 02 ऑक्टोबर (हिं.स.)। हिंदी सिनेमाची नव्याने व्याख्या करत चार दशके पूर्ण केल्यानंतरही मेगास्टार अनिल कपूर आजही तितकेच चर्चेत आहेत. जागतिक स्तरावर भारतीय ध्वज उंच फडकवत आहेत. सुभेदार या सिनेमाच्या दिग्गज अभिनेत्याला सुरेश त्रिवेणी यांच्या ॲक्शन-ड्रामा सुबेदार अर्जुन मौर्य यांची भूमिका साकारल्याबद्दल प्रतिष्ठित एशियन अकॅडमी क्रिएटिव्ह अवॉर्ड्समध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता - प्रमुख भूमिकेतील या श्रेणीत नामांकन मिळाले आहे.

अधिकृत प्रसारणातील एक क्षण सोशल मीडियावर शेअर करताना अनिल कपूर यांनी या सन्मानाचा त्यांच्यासाठी काय अर्थ आहे या बद्दल भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांनी लिहिले “माझ्या प्रवासातील एक अतिशय खास क्षण !

@asianacademycreativeawards येथे सुबेदारसाठी प्रमुख भूमिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या पुरस्कारासाठी भारताचे प्रतिनिधित्व करत नामांकन मिळाल्याचा सन्मान वाटतो. संपूर्ण टीमचे आणि या चित्रपटाला पाठिंबा देणाऱ्या प्रत्येकाचे आभार.

त्यांनी दिग्दर्शक सुरेश त्रिवेणी यांच्याप्रतीही विशेष कृतज्ञता व्यक्त केले आहेत. @sureshtriveni_, आपण हा चित्रपट बनवताना जो प्रवास एकत्र केला, त्यामुळे हा सन्मान माझ्यासाठी आणखी खास आहे. सुबेदारसाठी दिग्दर्शक सुरेश त्रिवेणी यांनाही सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन (फीचर फिल्म) या श्रेणीत नामांकन मिळाले आहे.

मिस्टर इंडिया आणि नायक यांसारखे आयकॉनिक व्यावसायिक ब्लॉकबस्टर देण्यापासून ते स्लमडॉग मिलियनेअरमधील आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रशंसित अभिनयापर्यंत, अनिल कपूर यांची दीर्घ कारकीर्द कमाल राहिली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande