राम गोपाल वर्मा यांचा 'पोलिस कंपनी' चित्रपट ४ जून २०२७ रोजी होणार प्रदर्शित
मुंबई, 22 ऑक्टोबर (हिं.स.)। चित्रपट निर्माते राम गोपाल वर्मा यांनी त्यांच्या आगामी ''पोलिस कंपनी'' या ॲक्शन-थ्रिलर चित्रपटाची पहिली झलक (फर्स्ट लूक) सादर केली असून, तो चित्रपटगृहांमध्ये कधी प्रदर्शित होईल याची घोषणाही केली आहे. टी-सीरीजच्या बॅनरख
Police


मुंबई, 22 ऑक्टोबर (हिं.स.)। चित्रपट निर्माते राम गोपाल वर्मा यांनी त्यांच्या आगामी 'पोलिस कंपनी' या ॲक्शन-थ्रिलर चित्रपटाची पहिली झलक (फर्स्ट लूक) सादर केली असून, तो चित्रपटगृहांमध्ये कधी प्रदर्शित होईल याची घोषणाही केली आहे. टी-सीरीजच्या बॅनरखाली निर्मित या चित्रपटात अभिनेता हर्षवर्धन राणे मुख्य भूमिकेत दिसणार आहे. कायदा-सुव्यवस्था आणि गुन्हेगारीच्या जगावर आधारित हा चित्रपट ४ जून २०२७ रोजी प्रदर्शित होणार आहे.

प्रसिद्ध करण्यात आलेल्या पोस्टरमध्ये पोलीस अधिकारी एका निर्भय आणि आक्रमक अवतारात दिसत आहेत. हर्षवर्धन राणे यात मुंबईतील सुप्रसिद्ध 'एनकाउंटर स्पेशालिस्ट' दया नायक यांची भूमिका साकारणार आहे. सत्य घटनांवर आधारित हा चित्रपट १९९७ ते २००४ या काळात मुंबईतील गुन्हेगारी विश्वाविरुद्ध पोलिसांनी केलेल्या कारवाईवर भाष्य करतो. या काळात सुमारे ३०० गुंडांचा खात्मा करण्यात आला होता.

'पोलिस कंपनी'मध्ये हर्षवर्धन राणे यांच्यासोबत फरदीन खान, फातिमा सना शेख आणि परेश रावल हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. राम गोपाल वर्मा यांनी सोशल मीडियावर चित्रपटाची पहिली झलक शेअर करत त्यातील पात्रे आणि कथानकाबाबत माहिती दिली आहे. या घोषणेमुळे आणि पोस्टरच्या प्रकाशनामुळे प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबद्दल मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande