‘सजगता आणि काळजी’ हीच सायबर गुन्ह्यांपासून बचावाची गुरुकिल्ली
सोलापूर, 25 ऑक्टोबर (हिं.स.)। : अनोळखी लिंकवर क्लिक करणे, ओटीपी किंवा बँक खात्याची माहिती अनोळखी व्यक्तींना देणे आणि सोशल मीडियावरील संशयास्पद संदेशांवर विश्वास ठेवणे टाळा. तंत्रज्ञानाचा वापर करताना सजगता आणि सुरक्षितता बाळगणे हीच सायबर गुन्ह्यां
sdfg


सोलापूर, 25 ऑक्टोबर (हिं.स.)।

: अनोळखी लिंकवर क्लिक करणे, ओटीपी किंवा बँक खात्याची माहिती अनोळखी व्यक्तींना देणे आणि सोशल मीडियावरील संशयास्पद संदेशांवर विश्वास ठेवणे टाळा. तंत्रज्ञानाचा वापर करताना सजगता आणि सुरक्षितता बाळगणे हीच सायबर गुन्ह्यांपासून बचावाची गुरुकिल्ली आहे, असे मत सायबर तज्ज्ञांनी व्यक्त केले.

सोलापूर शहर पोलिस आयुक्तालय आणि क्राइम पत्रकार संघाच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी पोलिस आयुक्तालयात पत्रकारांसाठी सायबर गुन्ह्यांविषयी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत शहरातील सुमारे ८० पत्रकार सहभागी झाले होते.

कार्यशाळेत अनोळखी क्रमांकावरून येणारे संदेश, संशयास्पद लिंक, व्हॉट्सॲपवरील अनधिकृत संदेश आणि ऑनलाइन फसवणुकीच्या विविध प्रकारांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. एका चुकीच्या क्लिकमुळे मोबाईलमधील वैयक्तिक माहिती धोक्यात येऊ शकते. बँक खात्यांची माहिती, छायाचित्रे आणि आधारकार्डासारखी ओळखपत्रे सायबर गुन्हेगारांच्या हाती लागल्यास त्यांचा गैरवापर करून आर्थिक फसवणूक केली जाऊ शकते, असा इशारा तज्ज्ञांनी दिला.

सायबर तज्ज्ञ अविनाश पाटील आणि महिला पोलिस अंमलदार प्रांजली काळे यांनी डिजिटल अरेस्टच्या नावाखाली धमकावणे, बनावट पोलिस अधिकारी बनून नागरिकांना जाळ्यात ओढणे, शेअर बाजारातील गुंतवणुकीच्या आमिषाने मोठ्या रकमेची फसवणूक करणे, गॅस बिल भरण्याचे खोटे संदेश पाठवणे आणि झटपट कर्ज देणाऱ्या ॲप्सच्या माध्यमातून ब्लॅकमेलिंग करणे, अशा गुन्ह्यांची माहिती दिली. प्रत्यक्ष घटनांची उदाहरणे देत त्यांनी नागरिकांनी कोणती खबरदारी घ्यावी, हे स्पष्ट केले.

कार्यशाळेला पोलिस उपायुक्त (गुन्हे) अश्विनी पाटील, पोलिस उपायुक्त (परिमंडळ) प्रीतम यावलकर, सहाय्यक पोलिस आयुक्त (गुन्हे) दिलीप पवार, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद माने आणि क्राइम पत्रकार संघाचे अध्यक्ष विशाल भांगे यांच्यासह पोलिस अधिकारी, कर्मचारी आणि पत्रकार उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande