राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना भारतरत्न मिळवून देण्याच्या मोहिमेला रक्ताने सही करुन पाठिंबा
अमरावती, 25 ऑक्टोबर (हिं.स.) वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना त्यांच्या महान राष्ट्रकार्यासाठी भारतरत्न सन्मान देण्याच्या मागणीसाठी २१ ऑक्टोबरपासून बेमुदत जनआंदोलन सुरू करण्यात आले आहे. आंदोलनाच्या आज ५ व्या दिवशी राजीव गांधी पंचायतराज संघट
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना भारतरत्न मिळवून देण्याच्या मोहिमेला रक्ताने सही करुन पाठिंबा


अमरावती, 25 ऑक्टोबर (हिं.स.)

वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना त्यांच्या महान राष्ट्रकार्यासाठी भारतरत्न सन्मान देण्याच्या मागणीसाठी २१ ऑक्टोबरपासून बेमुदत जनआंदोलन सुरू करण्यात आले आहे. आंदोलनाच्या आज ५ व्या दिवशी राजीव गांधी पंचायतराज संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अविनाश उमरकर यांनी जनआंदोलन स्थळाला भेट देऊन स्वतःच्या रक्ताने पहिली सही करत राज्यव्यापी स्वाक्षरी अभियानाचा शुभारंभ केला. यावेळी त्यांनी समाधीस्थळाचे दर्शन घेत महाराजांच्या राष्ट्रकार्याचा गौरव केला आणि राजीव गांधी पंचायतराज संघटनेचा आंदोलनाला पूर्ण पाठिंबा जाहीर केला.

युवकांना जागृत करण्याचा आणि गाव मजबूत करून देश बळकट करण्याचा महाराजांचा संदेश अतुलनीय आहे, असे सांगत उमरकर यांनी हा लढा संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचवण्याचे काम करणार असल्याचे सांगितले. तर हे जनआंदोलन आणि भारतरत्नाची मागणी संसदेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यापर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन संघटनेचे जिल्हाध्यक्ष वैभव वानखडे यांनी सांगितले. या प्रसंगी वं. रा. श्री तुकडोजी महाराज जनआंदोलन सन्मान समितीचे जनआंदोलनकर्ते मनोहर साबळे, प्रशांत कांबळे, रमेश बोके, मनोज दिगांबरे, जगन साबळे, अमरावती जिल्हा प्रभारी सुरेंद्र उगले यांच्यासह शेकडो गुरुदेव भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande