
रत्नागिरी, 3 ऑक्टोबर (हिं.स.) । रत्नदुर्ग किल्ल्यावर रविवारी, दि. ४ ऑक्टोबर रोजी स्वच्छता व संवर्धन मोहीम आखण्यात आली आहे.
राज्य गड-किल्ले संवर्धन प्रतिष्ठानचा रत्नागिरी विभाग आणि रत्नागिरीतील राजा शिवछत्रपती परिवाराच्या संयुक्त विद्यमाने किल्ले रत्नदुर्ग येथे स्वच्छता व संवर्धन मोहीम आयोजित करण्यात आली आहे.
ही मोहीम रविवारी, सकाळी ८ वाजता सुरू होईल. किल्ल्याची स्वच्छता, संवर्धन तसेच ऐतिहासिक वास्तूंचे जतन करण्याच्या उद्देशाने या मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.
गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी नागरिक, शिवप्रेमी व दुर्गप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. अधिक माहितीसाठी ७६६६७ ०८२०१ किंवा ९९२०९ ०५९२० या क्रमांकावर संपर्क साधता येईल.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी