
मुंबई, 31 ऑक्टोबर, (हिं.स.)। अभिनेत्री आणि Miss Heritage International किताबाची मानकरी शितल उपरे हिने साखरपुड्याची आनंदाची बातमी शेअर करत आयुष्यातील एका सुंदर नव्या पर्वाची सुरुवात केली आहे. शितलने अमित सिंघ यांच्याशी साखरपुडा केला असून, या जोडीचे रोमँटिक प्रपोजल फोटो सोशल मीडियावर विशेष चर्चेत आहेत.
चित्रपट, टेलिव्हिजन, थिएटर आणि The Legend of Hanuman मधील व्हॉइस आर्टिस्ट्रीसाठी ओळखल्या जाणाऱ्या Shital या इमोशनल वेलनेस कोच असून Singapore Airlines मध्ये माजी केबिन क्रू म्हणूनही कार्यरत होत्या. मिळालेल्या माहितीनुसार ती डिसेंबर २०२६ मध्ये मोजक्या आप्तस्वकीयांच्या सहवासात लग्न करणार असल्याचं कळतंय.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर