राष्ट्रपतींचा नाशिक दौरा रस्ते मार्गे
President Draupadi Murme's entire Nashik tour will be via road
President Draupadi Murme's


हवामान विभागाने पावसाचा अंदाज दिल्याने प्रशासनाने घेतला हा निर्णय

नाशिक, 31 ऑक्टोबर (हिं.स.)।

नाशिक - नाशिखमध्ये होत असलेल्या ध्वजारोहणासाठी आलेल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्म यांनी नाशिक मधील सर्व दौरा हा वाहनाने केला खराब हवामानामुळे त्यांना हा मार्ग पत्करावा लागला .

आज शनिवारी 31 ऑक्टोबर रोजी सिंहस्थ कुंभमेळा नाशिक आणि त्रंबकेश्वर या ठिकाणी सुरुवात झाली. नासिक मध्ये वैष्णवी पंथ तर त्र्यंबक मध्ये शिवपंथ आखाडे आहेत हे दोन्ही आखाडे सिंहस्थ कुंभ परवा मध्ये फक्त नासिक मध्येच वेगवेगळे राहतात आणि स्नान करतात हा इतिहास आहे. त्यामुळे नाशिक आणि त्रंबकेश्वर या दोन्ही ठिकाणी स्वतंत्र ध्वजारोहण केले जाते आणि स्वतंत्र शाही स्नान पण केले जाते.

आज सुरू झालेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी ध्वजारोहणाला प्रथमच देशाच्या राष्ट्रपती द्रोपदी मुर्म या आल्या आणि त्यांच्या हस्ते धार्मिक वातावरणात ध्वजारोहण झाले परंतु आज असलेल्या या ध्वजारोहणावरती हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पावसाचे सावट होते नाशिक शहरात सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते तर शुक्रवारी सायंकाळी नाशिक मधील काही भागांमध्ये पाऊस देखील पडला.

पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आल्यामुळे प्रशासनाने नासिक येथे महाराष्ट्र पोलीस अकॅडमी तर त्र्यंबकेश्वर येथे सपकाळ नॉलेज सिटी या ठिकाणी स्वतंत्र हेलिपॅड ची व्यवस्था केलेली होती या ठिकाणी हेलिपॅड ही तयार झाले होते. सर्वसाधारण हवाई मार्गे होणाऱ्या दौऱ्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने दीड कोटी रुपयांच्या आसपास खर्च देखील करण्यात आला आहे .परंतु अवघ्या तीन दिवसांपूर्वी म्हणजेच बुधवारी हवामान खात्याने पावसाचा अंदाज व्यक्त केल्यानंतर प्रशासनाने तातडीने हा सर्व दौरा रस्तेमागे करण्याचा निर्णय घेतला नाशिकहून त्रंबकेश्वर ला जाण्यासाठी सुमारे 35 मिनिटाचा कालावधी लागतो तर ओझर विमानतळावरून नाशिक येथील रामकुंडावर येण्यासाठी देखील 30 मिनिटांचा कालावधी लागतो. प्रशासनाने रस्ते मार्गे हा दौरा करण्याचा निर्णय घेतल्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्म यांनी शनिवारी नाशिकचा सर्व दौरा हा रस्तेमागे केला नाशिकमध्ये आल्यानंतर प्रथमच राष्ट्रपतींना अशा रस्ते मार्गे प्रवास करावा लागला.

---------------

हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI


 rajesh pande