‘कार्यालयीन हिंदीचा व्यावहारिक वापर’ या विषयावर कार्यशाळेचे आयोजन
छत्रपती संभाजीनगर, 31 ऑक्टोबर (हिं.स.)। डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील हिंदी विभाग आमी बँक ऑफ बडौदा राजभाषा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘कार्यालयीन हिंदीचा व्यावहारिक वापर’ या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेच
F


छत्रपती संभाजीनगर, 31 ऑक्टोबर (हिं.स.)। डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील हिंदी विभाग आमी बँक ऑफ बडौदा राजभाषा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘कार्यालयीन हिंदीचा व्यावहारिक वापर’ या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

या कार्यशाळेचे उद्घाटन ‘बँक ऑफ बडौदा’ चे मुख्य व्यवस्थापक प्रदीप कुमार यांच्या हस्ते झाले. यावेळी राजभाषा अधिकारी प्रतीका साकल्ले, विभागप्रमुख डॉ. संजय राठोड, डॉ. बळीराम धापसे यांची उपस्थिती होती. ज्येष्ठ संपादक अमिताभ श्रीवास्तव अध्यक्षस्थानी होते. डॉ.संजय राठोड यांनी प्रास्ताविकात सांगितले की, हिंदी ही केवळ साहित्याची भाषा नसून विविध क्षेत्रांतील कामकाजाची भाषा आहे. या देशात हिंदी भाषा सर्वाधिक बोलली, लिहिली आणि समजली जाते. प्रशासकीय कामकाजात राजभाषा हिंदीचा वापर वाढविणे आवश्यक आहे. आज सरकारी तसेच निमसरकारी कार्यालयांमध्ये टिपण लेखन, संक्षेपण, प्रतिवेदन आणि पल्लवन यांना अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे प्रत्येक कर्मचाऱ्याला राजभाषा हिंदीची वाक्यरचना तसेच तिच्या पारिभाषिक शब्द संग्रहाची माहिती असणे आवश्यक आहे. या बाबी लक्षात घेऊन हिंदी विभागाने ‘कार्यालयीन हिंदीचा व्यावहारिक वापर’ या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले. प्रमुख वक्ते डॉ. बळीराम धापसे यांनी कार्यालयीन हिंदीच्या व्यावहारिक वापराबाबत आपले विचार मांडले. अध्यक्षीय समारोपात ज्येष्ठ संपादक अमिताभ श्रीवास्तव यांनी कार्यालयीन कामकाजात इंग्रजी बरोबरच हिंदी भाषेचा वापर वाढविण्याच्या आवश्यकतेवर भर दिला.

‘बँक ऑफ बडौदा ’च्या वतीने ‘मेधावी छात्र सन्मान’ योजने अंतर्गत (२०२५-२६) एम.ए. हिंदी विषयात प्रथम व द्वितीय क्रमांक मिळविलेल्या विद्यार्थ्यां पैकी वैभव कन्हाळे यांना ११,हजार तर मनीषा हिवराळे यांना ७ हजार रोख पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी डॉ. सुधाकर शेंडगे, डॉ. माजिद पटेल, डॉ. दिनेश सुरडकर, डॉ. सरला दवंडे तसेच डॉ. अनंत वडघने यांनी योगदान दिले.

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande