
मुंबई, ९ ऑक्टोबर, (हिं.स) : काही दुःखं अशी असतात, ज्यांना शब्दांत व्यक्त करणं कठीण असतं. ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी नीलकांती पाटेकर यांनी सोशल मीडियावर केलेली एक छोटीशी पोस्ट सध्या चर्चेत आहे. अवघ्या दोन शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या असून, त्यांच्या या पोस्टमधून दुःखाची तीव्रता जाणवते.
नीलकांती पाटेकर यांनी फेसबुकवर ‘एक शब्द... निःशब्द...’ असे लिहित आपल्या भावना व्यक्त केल्या. नानांच्या निधनानंतर त्यांनी केलेली ही पोस्ट त्यांच्या मनातील भावनांची मूक अभिव्यक्ती मानली जात आहे. त्यांच्या या शब्दांनी अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे.
नाना आणि नीलकांती पाटेकर यांच्या नात्याबद्दल गेल्या काही वर्षांत विविध चर्चा होत होत्या. दोघे स्वतंत्र राहत असल्याचेही सांगितले जात होते. मात्र, त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबतच्या चर्चांपलीकडे नानांच्या निधनानंतर नीलकांती यांनी व्यक्त केलेली ही प्रतिक्रिया विशेष लक्षवेधी ठरली आहे.
चित्रपट आणि रंगभूमीवरील आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या नाना पाटेकर यांच्या जाण्याने त्यांच्या चाहत्यांमध्ये शोक व्यक्त केला जात आहे. अशा वेळी नीलकांती यांच्या ‘निःशब्द’ या शब्दाने दुःख व्यक्त करण्यासाठी शब्दही अपुरे पडतात, ही भावना अधोरेखित केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर