पोलादपूरमध्ये वर्कशॉप आणि घर आगीत खाक; दोन्ही कुटुंबांना पालकमंत्र्यांची मदत
रायगड, 01 नोव्हेंबर (हिं.स.)। पोलादपूर शहरातील सह्याद्री नगर येथील लाकडी फर्निचर वर्कशॉपला लागलेल्या आगीची पाहणी करत रायगडचे पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांनी वर्कशॉपचे मालक राजेश सुतार यांना ७५ हजार रुपयांची सानुग्रह मदत दिली. तसेच तालुक्यातील बोर
Workshop and home reduced to ashes in a fire; Guardian Minister provides aid to both families


Workshop and home reduced to ashes in a fire; Guardian Minister provides aid to both families


रायगड, 01 नोव्हेंबर (हिं.स.)।

पोलादपूर शहरातील सह्याद्री नगर येथील लाकडी फर्निचर वर्कशॉपला लागलेल्या आगीची पाहणी करत रायगडचे पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांनी वर्कशॉपचे मालक राजेश सुतार यांना ७५ हजार रुपयांची सानुग्रह मदत दिली. तसेच तालुक्यातील बोरज गावातील घराला आग लागून नुकसान झालेल्या झाडाणे कुटुंबाला २५ हजार रुपयांची तातडीची मदत केली आहे.

पोलादपूर नगरपंचायत आणि पोलीस ठाण्याजवळील सह्याद्री नगर येथे राजेश सुतार यांचे लाकडी फर्निचर तयार करण्याचे वर्कशॉप आहे. मंगळवारी पहाटेच्या सुमारास या वर्कशॉपला आग लागली. या आगीत सोफासेट, दरवाजे, बेड यांसह तयार फर्निचर आणि अन्य साहित्य जळून खाक झाले. या दुर्घटनेमुळे सुतार यांच्या स्वयंरोजगाराच्या साधनाचे मोठे नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री गोगावले यांनी वर्कशॉपला भेट देऊन नुकसानीची पाहणी केली आणि सुतार यांना ७५ हजार रुपयांची मदत दिली.

दरम्यान, पोलादपूर तालुक्यातील बोरज येथे अशोक चंद्रू झाडाणे यांच्या घराला रविवारी सकाळी आग लागून मोठे नुकसान झाले होते. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पालकमंत्र्यांनी झाडाणे कुटुंबासाठी २५ हजार रुपयांची तातडीची मदत दिल . उर्वरित सानुग्रह मदत लवकरच बोरज येथे पोहोचवण्यात येईल, अशी माहिती नगरपंचायतीचे सभापती सिद्धेश शेठ यांनी दिली.

यावेळी जिल्हा परिषद अर्थ, शिक्षण व क्रीडा सभापती चंद्रकांत कळंबे, नगरपंचायतीचे सभापती सिद्धेश शेठ, नगरसेवक विनायक दीक्षित, जांभळेकर, शंकर बांदल, स्वप्निल चोरगे, नंदू कळंबे आदी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande