रत्नागिरी : भांबेड ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याला उत्साहात प्रारंभ
रत्नागिरी, 10 नोव्हेंबर (हिं.स.) । भांबेड (ता. लांजा) येथून भक्ती, श्रद्धा आणि विठ्ठलनामाचा गजर करीत पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करणाऱ्या वारकऱ्यांच्या पायी दिंडी सोहळ्याला उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला. या दिंडी सोहळ्याला आमदार किरण (भैय्या
रत्नागिरी : भांबेड ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याला उत्साहात प्रारंभ


रत्नागिरी, 10 नोव्हेंबर (हिं.स.) । भांबेड (ता. लांजा) येथून भक्ती, श्रद्धा आणि विठ्ठलनामाचा गजर करीत पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करणाऱ्या वारकऱ्यांच्या पायी दिंडी सोहळ्याला उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला.

या दिंडी सोहळ्याला आमदार किरण (भैय्या) सामंत यांनी उपस्थित राहून वारकऱ्यांना शुभेच्छा दिल्या. गेल्या ३१ वर्षांपासून वारकऱ्यांकडून करण्यात येत असलेली गावडी घाटातून रस्त्याची मागणी आमदार किरण सामंत यांच्या प्रयत्नांतून पूर्ण झाल्याने वारकऱ्यांनी त्यांचे विशेष आभार मानले.

भांबेड येथून दरवर्षी मोठ्या श्रद्धेने वारकरी पंढरपूरच्या दिशेने पायी दिंडीने प्रस्थान करतात. गेल्या ३१ वर्षांपासून या मार्गावरून वारकऱ्यांना पायी प्रवास करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. गावडी घाटातून वारकऱ्यांसाठी रस्ता उपलब्ध व्हावा, अशी मागणी वारकऱ्यांकडून सातत्याने करण्यात येत होती. अनेक वर्षे ही मागणी प्रलंबित राहिली होती. वारकऱ्यांची ही जुनी मागणी आमदार किरण (भैय्या) सामंत यांच्या माध्यमातून मार्गी लागल्याने ३१ वर्षांची प्रतीक्षा संपली आहे. गावडी घाटातून वारकऱ्यांसाठी रस्त्याची सुविधा उपलब्ध झाल्याने पंढरपूरच्या वारीचा मार्ग अधिक सुकर होण्यास मदत झाली आहे. त्यामुळे यंदाच्या दिंडी सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

पायी दिंडी सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित राहिलेल्या आमदार किरण सामंत यांचे वारकऱ्यांनी मनापासून आभार मानले. वारकरी संप्रदायाची परंपरा ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक जीवनाचा अविभाज्य भाग आहे. विठ्ठलाच्या दर्शनासाठी शेकडो किलोमीटरचा पायी प्रवास करणाऱ्या वारकऱ्यांना आवश्यक सुविधा मिळणे ही लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाची जबाबदारी आहे. गावडी घाटातून रस्त्याची सुविधा उपलब्ध झाल्याने वारकऱ्यांच्या अनेक वर्षांच्या अडचणी दूर होण्यास मदत झाली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande