एचडीएफसी लाईफतर्फे 'लिफ्ट युअर प्रोटेक्शन' मालिकेचा शुभारंभ
सध्याच्या तरुण पिढीमध्ये जीवन विम्याचे महत्त्व बिंबवण्यासाठी डिजिटल मायक्रोड्रामा मालिका मुंबई, 12 नोव्हेंबर (हिं.स.) : भारतातील आघाडीच्या जीवन विमा कंपन्यांपैकी एक असलेल्या एचडीएफसी लाईफने तरुणांना जीवन विम्याचे महत्त्व अधिक प्रभावीपणे विषद करण
HDFC Life


प्रितीका शाह


* सध्याच्या तरुण पिढीमध्ये जीवन विम्याचे महत्त्व बिंबवण्यासाठी डिजिटल मायक्रोड्रामा मालिका

मुंबई, 12 नोव्हेंबर (हिं.स.) : भारतातील आघाडीच्या जीवन विमा कंपन्यांपैकी एक असलेल्या एचडीएफसी लाईफने तरुणांना जीवन विम्याचे महत्त्व अधिक प्रभावीपणे विषद करण्यासाठी 'लिफ्ट युअर प्रोटेक्शन' ही चार भागांची डिजिटल स्वरुपातील सुक्ष्म स्वरुपातील नाट्यमालिका (मायक्रोड्रामा) नुकतीच प्रकाशित केली आहे. आजच्या तरुण पिढीच्या आर्थिक नियोजनात विम्याचा अविभाज्य घटक समाविष्ट म्हणून समावेश करण्यासाठी कंपनी सतत प्रयत्नशील आहे. त्याचअनुषंगाने दैनंदिन जीवनात जीवन विमा किती महत्त्वाचा आहे, हे तरुण पिढीच्या मनावर बिंबवण्यासाठी साठी मनोरंजनाचे माध्यम वापरण्याचा हा विशेष उपक्रम आहे.

एचडीएफसी लाईफच्या विपणन धोरणांत ग्राहकांसाठी विमा संरक्षण हा नेहमीच एक महत्वाचा घटक राहिलेला आहे. 'लिफ्ट युअर प्रोटेक्शन' ही मायक्रोड्रामा मालिका कंपनीने अलीकडेच सुरू केलेल्या टर्म योजनेच्या जाहीरातीवर आधारित आहे. या मालिकेद्वारे विद्यमान परिस्थिला साजेस्या कथानकाच्या आधारे जीवन विम्याचे महत्व पटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. . तसेच विमा योजना किती महत्वाची आहे, या मुद्दावर या नाट्यमालिकेत अधिकाधिक भर देण्यात आलेला आहे. जनजागृती पुरते मर्यादित न राहता, ही मालिका तरुण प्रेक्षकांना त्यांच्या स्वः संरक्षण गरजांबाबत विचार करण्यास प्रवृत्त करते आणि कुटुंबांच्या आर्थिक भविष्याचे रक्षण करण्यात टर्म इन्शुरन्सची भूमिका किती महत्वाची आहे, हे पटवून देण्यास मदत करते.

लिफ्टमधून दररोज प्रवास करणे या साध्या सोप्या थीमवर आधारित असलेले हे कथानक स्वतःच्या योजना आणि जबाबदाऱ्यांमध्ये मग्न असलेल्या चार व्यक्तींभोवती फिरते. एक अनपेक्षित वळण या चौघांच्या वाटचालीत व्यत्यय आणते. कथानकातील ओळखीची पात्रे आणि त्याच्यासमवेत घडणाऱ्या अनपेक्षित प्रसंगाआधारे ही नाट्यमालिका जीवन विमा या महत्वाच्या वास्तवावर प्रकाशझोत टाकते. अनेक व्यक्ती त्यांच्या आयुष्यातील अनेक गोष्टींचे अगदी काळजीपूर्वक नियोजन करतात, परंतु अनपेक्षित घटनांसाठी आवश्यक असलेल्या आर्थिक तयारीत ते बऱ्याचदा मागे पडू शकते, हे वास्तव हे कथानक अगदी सहज उलगडते. विमा संरक्षणाला नेहमीच्या जीवनामध्ये स्थान देताना ही नाट्यमालिका आर्थिक सुरक्षेची गरज ओळखणे आणि ते साध्य करण्यासाठी जीवन विमारुपी कवच घेत अर्थपूर्ण पाऊल टाकणे, यामध्ये सध्या असलेली दरी कमी करण्याचा प्रयत्न करते.

सुक्ष्म नाट्यमालिकेच्या शुभारंभप्रसंगी बोलताना एचडीएफसी लाईफच्या मार्केटिंग आणि सीएसआरच्या प्रमुख प्रितीका शाह म्हणाल्या, 'एचडीएफसी लाईफचे टर्म इन्शुरन्सच्या प्रचारावर सातत्याने लक्ष आहे आणि कंपनी नेहमीच वेगवेगळ्या ग्राहकांनुसार वेगळे आणि योग्य असे विपणन धोरण राबवते हे धोरण सातत्यपूर्ण आणि विचारपूर्वक साकारलेल्या दृष्टिकोनावर आधारलेले असते . तरणाईच्या बदलत्या आवडीनिवडी आणि त्यांची डिजिटल जीवनशैली लक्षात घेऊन, त्यांना विम्याचे महत्त्व समजवणे अतिशय गरजेचे आहे. म्हणूनच, तरुणांना आवडणाऱ्या आणि सध्या ट्रेंडमध्ये असलेल्या 'मायक्रोड्रामा' (सुक्ष्म नाटिका) माध्यमातून त्यांनी 'लिफ्ट युअर प्रोटेक्शन' ही मालिका आणली आहे, जेणेकरून लोक मनोरंजनासोबतच विम्याचे महत्त्व सहज समजू शकतील.

चार अगदी छोट्या भागांमध्ये तयार केलेली ही नाट्यमालिका लोकांमध्ये उत्सुकता निर्माण करते. आजच्या तरुण पिढीला ज्या प्रकारचा कंटेट पाहायला आवडतो, त्या माध्यमातून त्यांच्याशी संवाद साधते जीवन विम्याचा विषय प्रत्येकाच्या आयुष्याशी कसा जोडलेला आहे, हे सोप्या पद्धतीने दाखवून, ही मालिका लोकांना केवळ विम्याची माहिती देण्यापुरती मर्यादित न राहता, प्रत्यक्षात जीवन विम्याचा विचार करण्यास प्रोत्साहित करते. एचडीएफसी लाईफच्या याच दृष्टीने सुरु असलेल्या प्रयत्नांना नवी दिशा देखील देते.

एचडीएफसी लाईफच्या डिजिटल आणि सोशल मीडिया चॅनेलवर ही नाट्य मालिका उपलब्ध आहे.

नाट्य मालिका पाहण्यासाठी लिंक : https://www.youtube.com/playlist?list=PLJH5sB62D65I

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande