वाढदिवसाचा अनोखा संकल्प; जितेंद्र पाटील यांच्या पुढाकारातून सह्याद्रीत वृक्षारोपण
रायगड, 14 नोव्हेंबर (हिं.स.)। सह्याद्रीच्या निसर्गसंपदेचे रक्षण आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने रविवारी (१५ नोव्हेंबर) साईडोंगर, पोटल पाली येथे वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मनसेचे रायगड
कर्जत | प्रतिनिधी : सह्याद्रीच्या निसर्गसंपदेचे रक्षण आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने रविवारी (१५ नोव्हेंबर) साईडोंगर, पोटल पाली येथे वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मनसेचे रायगड जिल्हाध्यक्ष तथा महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेनेचे अध्यक्ष जितेंद्र पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.  सह्याद्रीचे संरक्षण, वृक्षसंवर्धन आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी एकत्र येण्याची गरज असल्याचा संदेश या उपक्रमातून दिला जाणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पर्यावरणविषयक विचारांना अनुसरून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.  या वृक्षारोपण उपक्रमात मनसेचे पदाधिकारी, महाराष्ट्र सैनिक तसेच पर्यावरणप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन कर्जत तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आले आहे.  कार्यक्रमासाठी रविवारी सकाळी ८.३० वाजता दहिवली येथील छत्रपती संभाजी महाराज स्मारक येथे सर्वांनी एकत्र जमायचे असून, तेथून साईडोंगर येथील वृक्षारोपणस्थळी जाण्याचे नियोजन करण्यात आले आहे.  सह्याद्रीच्या संवर्धनासाठी केवळ घोषणा न करता प्रत्यक्ष कृतीतून पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्याचा मनसेचा प्रयत्न या उपक्रमातून दिसून येत आहे.


रायगड, 14 नोव्हेंबर (हिं.स.)। सह्याद्रीच्या निसर्गसंपदेचे रक्षण आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने रविवारी (१५ नोव्हेंबर) साईडोंगर, पोटल पाली येथे वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मनसेचे रायगड जिल्हाध्यक्ष तथा महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेनेचे अध्यक्ष जितेंद्र पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

सह्याद्रीचे संरक्षण, वृक्षसंवर्धन आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी एकत्र येण्याची गरज असल्याचा संदेश या उपक्रमातून दिला जाणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पर्यावरणविषयक विचारांना अनुसरून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

या वृक्षारोपण उपक्रमात मनसेचे पदाधिकारी, महाराष्ट्र सैनिक तसेच पर्यावरणप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन कर्जत तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आले आहे.

कार्यक्रमासाठी रविवारी सकाळी ८.३० वाजता दहिवली येथील छत्रपती संभाजी महाराज स्मारक येथे सर्वांनी एकत्र जमायचे असून, तेथून साईडोंगर येथील वृक्षारोपणस्थळी जाण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

सह्याद्रीच्या संवर्धनासाठी केवळ घोषणा न करता प्रत्यक्ष कृतीतून पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्याचा मनसेचा प्रयत्न या उपक्रमातून दिसून येत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande