रत्नागिरी : चिपीच्या तुलनेत रत्नागिरी विमानतळ अधिक सुसज्ज - उदय सामंत
रत्नागिरी, 14 नोव्हेंबर (हिं.स.) । चिपी विमानतळाच्या तुलनेत रत्नागिरी विमानतळ अधिक सुसज्ज असेल, असा विश्वास पालकमंत्री उदय सामंत यांनी चिपळूण येथे व्यक्त केला. चिपळूण पालिकेच्या नव्या इमारतीच्या भूमिपूजन समारंभात बोलताना त्यांनी याबाबत सांगितले. त
रत्नागिरी : चिपीच्या तुलनेत रत्नागिरी विमानतळ अधिक सुसज्ज - उदय सामंत


रत्नागिरी, 14 नोव्हेंबर (हिं.स.) । चिपी विमानतळाच्या तुलनेत रत्नागिरी विमानतळ अधिक सुसज्ज असेल, असा विश्वास पालकमंत्री उदय सामंत यांनी चिपळूण येथे व्यक्त केला.

चिपळूण पालिकेच्या नव्या इमारतीच्या भूमिपूजन समारंभात बोलताना त्यांनी याबाबत सांगितले. ते म्हणाले, रत्नागिरीकरांचे नियमित विमानसेवेचे स्वप्न लवकरच प्रत्यक्षात उतरणार आहे. रत्नागिरी विमानतळावरील टर्मिनल इमारतीचे काम पूर्ण झाले असून, जानेवारी २०२७ च्या पहिल्या आठवड्यापर्यंत येथून नियमित विमानसेवा सुरू करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण प्रगती झाली आहे.

रत्नागिरी विमानतळाच्या कामाला गती मिळाली असून, टर्मिनल इमारतीचे काम पूर्ण झाल्याने विमानसेवा सुरू होण्याच्या दिशेने महत्त्वाचा टप्पा पार पडला आहे. जानेवारी २०२७ च्या पहिल्या आठवड्यापर्यंत नियमित विमानसेवा सुरू करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

विमानसेवा सुरू झाल्यानंतर रत्नागिरी जिल्ह्याच्या दळणवळण व्यवस्थेला मोठी चालना मिळणार आहे. पर्यटन, उद्योग आणि व्यापार क्षेत्रालाही त्याचा लाभ होणार असून, मुंबईसह अन्य शहरांशी रत्नागिरीची हवाई कनेक्टिव्हिटी अधिक मजबूत होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे रत्नागिरीकरांचे अनेक वर्षांचे विमानसेवेचे स्वप्न लवकरच पूर्ण होण्याची चिन्हे आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande