
रत्नागिरी, 14 नोव्हेंबर (हिं.स.) । विलवडे रेल्वे स्थानक रिक्षा संघटनेतर्फे मुख्य रस्त्यापासून स्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्याची डागडुजी करण्यात आली.
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मुख्य रस्ता ते स्थानकापर्यंतचा रस्ता अनेक खड्ड्यांनी आणि रानाने वेढलेला होता. रेल्वे स्थानक प्रवाशांना जा ये करताना व तेथे येणाऱ्या वाहनांना याचा त्रास होत होता. त्यामुळे रिक्षा संघटनेने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही श्रमदानातून खड्डे भरण्याचे काम केले.
रिक्षा संघटनेच्या या लोकोपयोगी उपक्रमाबद्दल विलवडे रेल्वे स्थानक प्रवासी संघटना व परिसरातील प्रवाशांनी समाधान व्यक्त करून रिक्षा संघटनेच्या कार्यकर्त्यांचे पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. हा रस्ता सिमेंट काँक्रीटचा व्हावा, तसेच ज्याची रुंदी वाढवण्यात यावी असे निवेदन स्थानकप्रमुखांना देण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी