शिपोशीच्या मॅरेथॉनमध्ये चिपळूणच्या मनस्वी गुढेकर प्रथम
रत्नागिरी, 15 नोव्हेंबर (हिं.स.) । शिपोशी (ता. लांजा) येथे आज झालेल्या सह्याद्री हिल मॅरेथॉनमध्ये चिपळूणच्या सौ. मनस्वी मानस गुढेकर यांनी ३६ ते ४५ वर्षे वयोगटातील महिला गटात प्रथम क्रमांक पटकावला. डोंबिवलीतील वैष्णवी फाउंडेशन आणि शिपोशीतील माजी व
मनस्वी गुढेकर यांना पारितोषिक


रत्नागिरी, 15 नोव्हेंबर (हिं.स.) । शिपोशी (ता. लांजा) येथे आज झालेल्या सह्याद्री हिल मॅरेथॉनमध्ये चिपळूणच्या सौ. मनस्वी मानस गुढेकर यांनी ३६ ते ४५ वर्षे वयोगटातील महिला गटात प्रथम क्रमांक पटकावला.

डोंबिवलीतील वैष्णवी फाउंडेशन आणि शिपोशीतील माजी विद्यार्थी संघटनेने आयोजित केलेल्या आणि सह्याद्रीच्या निसर्गरम्य डोंगररांगांमध्ये पार पडलेल्या या स्पर्धेत आपल्या वयोगटातील सर्व महिला धावपटू सहभागी झाल्या होत्या. त्यामध्ये आपल्या गटात सौ. गुढेकर यांना १० हजार रुपयांचे पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.

शेकडो धावपटूंचा उत्स्फूर्त सहभाग लाभलेल्या या मॅरेथॉन स्पर्धेत चिपळूण हाफ मॅरेथॉन ग्रुपच्या २५ सदस्यांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी सात धावपटूंनी विविध वयोगटांत प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवत ‘पोडियम फिनिशर’ होण्याचा बहुमान प्राप्त केला. यामध्ये मनस्वी गुढेकर यांची कामगिरी विशेष लक्षवेधी ठरली. त्या ‘मॅनकाइंड फार्मा’ कंपनीचे अधिकारी तसेच चिपळूण हाफ मॅरेथॉन ग्रुपचे सदस्य मानस गुढेकर यांच्या पत्नी असून, या पती-पत्नी दोघांनाही धावण्याची आणि फिटनेसची विशेष आवड आहे.

मनस्वी गुढेकर गेल्या सलग चार वर्षांपासून रत्नागिरी जिल्ह्यात आयोजित होणाऱ्या विविध मॅरेथॉन स्पर्धांमध्ये आपल्या वयोगटात सातत्याने पोडियम फिनिशर ठरत आहेत. नियमित सराव, कठोर शिस्त आणि जिद्दीच्या जोरावर त्यांनी धावण्याच्या क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande