लातूर केंद्रावरील राज्य नाट्य स्पर्धा १६ नोव्हेंबरपासून
लातूर, 15 नोव्हेंबर (हिं.स.) हौशी नाट्य कलावंत आणि नाट्य रसिकांची उत्कंठा वाढवणाऱ्या ६५ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा लातूर केंद्रावर दि. १६ नोव्हेंबरपासून सुरु होत आहे या स्पर्धेत लातूर जिल्ह्यातील १५ नामवंत नाट्य संघांचा समावेश आ
नाट्य स्पर्धा


लातूर, 15 नोव्हेंबर (हिं.स.) हौशी नाट्य कलावंत आणि नाट्य रसिकांची उत्कंठा वाढवणाऱ्या ६५ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा लातूर केंद्रावर दि. १६ नोव्हेंबरपासून सुरु होत आहे या स्पर्धेत लातूर जिल्ह्यातील १५ नामवंत नाट्य संघांचा समावेश आहे. दि. ३० नोव्हेंबरपर्यंत रंगणारी ही नाट्य स्पर्धा दर्दीनाट्य रसिकांसाठी सांस्कृतिक मेजवानी असणार आहे.

राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाद्वारे आयोजित या नाट्य स्पर्धेतील दररोज एका नाटकाचा प्रयोग शहरातील मार्केट यार्डातील स्व. दगडोजीराव देशमुख स्मृती सभागृहात दररोज सायंकाळी ७ वाजता असून नाट्यकलावंत आपली विविध विषयांवरील मनोवेधक नाटकं सादर करणार आहेत.

सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार व सांस्कृतिक कार्य विभागाचे संचालक प्रशांत खेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य नाट्य स्पर्धा पार पडणार आहे. या स्पर्धेचा नाट्य रसिकांनी उपस्थित राहून हौशी नाट्य कलावंतांचा उत्साह वाढवावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे

या स्पर्धेत, लाडू (उन्नती फाऊंडेशन, लातूर), त्रिकोणाची चौथी बाजू (संजीवन चॅरिटेबल ट्रस्त, लातूर), देवनगरी (सम्यक बहुउद्देशीय सेवाभावी ज्ञानप्रसारक मंडळ, लातूर), पगला घोडा (माऊली चॅरिटेबल ट्रस्ट, लातूर), टू इज कंपनी (माजी विद्यार्थी संघ जयक्रांती अध्याप महाविद्यालय, लातूर), आणि हे शकर सुद्धा (माजी विद्यार्थी संघ दयानंद

महाविद्यालय, लातूर), मृत्यू आधीच झाला होता (कल्पवृक्ष सांस्कृतिक शैक्षणिक सेवाभावी संस्था, उदगीर), सृजनमयसभा (कलोपासक मंडळ, लातूर), आवर्तन (कलारंग, लातूर), रंगलेल्या गालाचा मुका (कै. ग्यानोबा शिवराम कोटंबे बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, लातूर), बेईमानी (धर्मवीरराजे प्रतिष्ठान, उदगीर), खेळीमेळी (देशभक्त राजगुरू बहुउद्देशीय सांस्कृतिक युवक क्रीडा मंडळ, लातूर), वात्सल्यम (अस्मितापर्व फाऊंडेशन, लातूर), नथिंग टू से (अनुभव सेवाभावी संस्था, लातूर) आणि चाफा सुगंधी (अभयरत्न सामाजिक विकास संस्था, लातूर) या नाटकांचा समावेश आहे, अशी माहिती ज्येष्ठ रंगकर्मी बाळकृष्ण धायगुडे यांनी दिली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande