'ईठा' चित्रपटातील 'जी जी रे जी' गाण्याचा टीझर प्रदर्शित; उद्या पूर्ण गाणे होणार रिलीज
मुंबई, 16 नोव्हेंबर (हिं.स.)। मॅडॉक फिल्म्स आणि कठपुतली क्रिएशन्स यांनी त्यांच्या आगामी ''ईठा'' चित्रपटातील ''जी जी रे जी'' या गाण्याचा टीझर प्रदर्शित केला आहे. श्रद्धा कपूर या चित्रपटात ईठा ही भूमिका साकारत आहे. गाण्याच्या पहिल्या झलकमध्ये श
TEASER EETHA SONG Ji Ji Re Ji RELEASED SONG OUT


मुंबई, 16 नोव्हेंबर (हिं.स.)। मॅडॉक फिल्म्स आणि कठपुतली क्रिएशन्स यांनी त्यांच्या आगामी 'ईठा' चित्रपटातील 'जी जी रे जी' या गाण्याचा टीझर प्रदर्शित केला आहे. श्रद्धा कपूर या चित्रपटात ईठा ही भूमिका साकारत आहे. गाण्याच्या पहिल्या झलकमध्ये श्रद्धा पारंपरिक वेशभूषेत दिसत आहे. तिच्या नृत्याविष्कारातून आणि मंचावरील दमदार सादरीकरणातून चित्रपटातील संगीताने सजलेल्या दुनियेची झलक पाहायला मिळत आहे. निर्मात्यांच्या माहितीनुसार, या गाण्याची संपूर्ण आवृत्ती उद्या प्रदर्शित केली जाणार आहे.

'जी जी रे जी' हे गाणे राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या संगीतकार जोडी अजय-अतुल यांनी तयार केले आहे. त्यांनी या गाण्याला संगीत देण्यासोबतच त्याचे संयोजन आणि निर्मितीही केली आहे. या गाण्याचे बोल अमिताभ भट्टाचार्य यांनी लिहिले असून, श्रेया घोषाल यांनी आपल्या सुमधुर आवाजात ते गायले आहे. तर या गाण्याचे नृत्यदिग्दर्शन वैभवी मर्चंट यांनी केले आहे. चित्रपटात संगीताला कथेचा महत्त्वपूर्ण भाग बनवण्यात आले आहे. याच्या माध्यमातून मुख्य पात्राची स्वप्ने, भावना आणि संघर्ष दाखवण्यात येणार आहे.

लक्ष्मण उतेकर यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला 'ईठा' हा एक भव्य संगीतमय नाट्यपट आहे. या चित्रपटाची निर्मिती दिनेश विजान, लक्ष्मण उतेकर आणि करिश्मा शर्मा यांनी केली आहे. चित्रपटात श्रद्धा कपूर एका अशा कलाकाराची भूमिका साकारत आहे, जिचा प्रवास पुढे जाऊन तिला मोठी ओळख मिळवून देतो. 'ईठा' हा चित्रपट ४ डिसेंबर २०२६ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande