नाहिद राणा दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत पुनरागमन करण्यास सज्ज
ढाका, 19 नोव्हेंबर (हिं.स.)बांगलादेशचा वेगवान गोलंदाज नाहिद राणा दीर्घकाळ मैदानाबाहेर राहिल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्यास सज्ज झाला आहे. ऑस्ट्रेलियातील वैद्यकीय तज्ज्ञांनी त्याला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आगामी एकदिवसीय मालिकेत
नाहिद राणा


ढाका, 19 नोव्हेंबर (हिं.स.)बांगलादेशचा वेगवान गोलंदाज नाहिद राणा दीर्घकाळ मैदानाबाहेर राहिल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्यास सज्ज झाला आहे. ऑस्ट्रेलियातील वैद्यकीय तज्ज्ञांनी त्याला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आगामी एकदिवसीय मालिकेत खेळण्यासाठी हिरवा कंदील दिला आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेतून बाहेर पडलेला राण ऑस्ट्रेलियात पुनर्वसन प्रक्रिया पूर्ण करून नुकताच मायदेशी परतला आहे. तिथे त्याने नामांकित डॉक्टरांच्या देखरेखीखाली वैद्यकीय तपासणीही करून घेतली. राणा सध्या पूर्ण क्षमतेने गोलंदाजी करत आहे. त्याने बांगलादेश क्रिकेट बोर्डाला (बीसीबी) आपल्या शारीरिक स्थितीबाबत माहिती दिली.तो बीसीबीच्या डॉक्टरांना भेटायला आला होता. ऑस्ट्रेलियन डॉक्टरांनी दिलेल्या अहवालानुसार, त्याला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत खेळण्याची परवानगी देण्यात आली आहे.

'लॅब्रम टियर'च्या दुखापतीमुळे राणा दक्षिण आफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिका खेळू शकला नाही. याआधीही त्याला अनेक दुखापतींचा सामना करावा लागला होता. जुलै महिन्यात झिम्बाब्वे दौऱ्यावर असताना त्याला 'ग्रेड-टू साइड स्ट्रेन' झाला होता, ज्यामुळे तो ऑस्ट्रेलिया दौरा, आशियाई खेळ आणि अफगाणिस्तानविरुद्धची एकमेव कसोटी खेळू शकला नाही.त्यानंतर, पुनर्वसन प्रक्रियेदरम्यान त्याला नितंबाच्या भागात नवीन दुखापत झाली, ज्यामुळे तो अफगाणिस्तान आणि झिम्बाब्वेविरुद्धच्या संयुक्त मालिकेतून बाहेर पडला. त्यानंतर 'लॅब्रम टियर'च्या दुखापतीमुळे तो वेस्ट इंडिजविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतूनही बाहेर राहिला.

याआधी, बीसीबीचे मुख्य निवडकर्ता हबीबुल बशर यांनी सांगितले होते की, राणाला पुन्हा मैदानात उतरवण्यासाठी ते कोणतीही घाई करणार नाहीत. मात्र, सध्याची स्थिती पाहता, तो पूर्णपणे बरा झाला असून दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत पुनरागमन करण्यास सक्षम असल्याचे दिसते. बीसीबीच्या वैद्यकीय पथकाने २४ नोव्हेंबरपर्यंत त्याच्या प्रगतीवर लक्ष ठेवण्यासाठी एक योजना आखली आहे, त्यानंतरच संघ व्यवस्थापन त्याच्या सहभागाबाबत अंतिम निर्णय घेईल.कसोटी मालिका संपल्यानंतर बांगलादेश संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन एकदिवसीय आणि तीन टी-२० सामने खेळणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande