कामगारांच्या हक्कांचे, सन्मानाचे आणि कल्याणाचे संरक्षण करण्यासाठी संघटना कायम पाठीशी - रविंद्र चव्हाण
विमानतळ कामगारांचा अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघात जाहीर प्रवेश मुंबई, 02 नोव्हेंबर (हिं.स.) - मुंबई विमानतळावरील ग्राऊंड हँडलिंग, सहार येथील कार्गो तसेच वसई - विरार महापालिकेतील हजारो कामगारांनी त्यांच्या पूर्वीच्या संघटनांचा त्याग करून सोमवा
रविंद्र चव्हाण


रविंद्र चव्हाण


विमानतळ कामगार अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघात प्रवेश


* विमानतळ कामगारांचा अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघात जाहीर प्रवेश

मुंबई, 02 नोव्हेंबर (हिं.स.) - मुंबई विमानतळावरील ग्राऊंड हँडलिंग, सहार येथील कार्गो तसेच वसई - विरार महापालिकेतील हजारो कामगारांनी त्यांच्या पूर्वीच्या संघटनांचा त्याग करून सोमवारी अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघात जाहीर प्रवेश केला. यावेळी महासंघाचे अध्यक्ष श्री. रविंद्र चव्हाण यांनी त्यांचे स्वागत करत या कामगारांच्या हक्कांचे, सन्मानाचे आणि कल्याणाचे संरक्षण करण्यासाठी संघटना कायम त्यांच्या पाठीशी उभी राहील, अशी ग्वाही दिली. यावेळी संघाचे चिटणीस सुहास माटे उपस्थित होते. भाजपा प्रदेश कार्यालयात हा प्रवेश सोहळा पार पडला.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली कायम कामगारांच्या हिताचा विचार केला जात आहे. त्या दृष्टीने जे जे करता येईल ते केले जात आहे. हे कामगार काम करत असलेल्या पूर्वीच्या संघटनांमध्ये कामगारांची पिळवणूक होत होती. अनेक अडचणींशी त्यांना सामना करावा लागत होता. त्यामुळे त्यांनी अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आणि आम्हीही संघटना बांधण्याचा निर्णय घेतला. यापुढच्या काळात सर्व संघटनांमधील कामगारांच्या अडचणींचा विचार करून त्या सोडवण्यास प्राधान्य दिले जाईल, असे महासंघाचे अध्यक्ष श्री. रविंद्र चव्हाण यांनी यावेळी सांगितले.

यावेळी सहार कार्गो विभागातील भारतीय कामगार सेनेशी संलग्न असलेल्या सुमारे 500 कामगार आणि ट्रान्सपोर्टरनी अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघात प्रवेश केला. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल 2 येथील एजीएच एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीच्या संपूर्ण ग्राउंड हँडलिंग कर्मचारी वर्गानेही संघात प्रवेश केला. याचबरोबर वसई - विरार महापालिकेतील कर्मचारी वर्गानेही संघात प्रवेश केला.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande