सलमान आणि नयनतारा एकत्र झळकणार; ‘मॉन्स्टर’मध्ये पाहायला मिळणार ॲक्शनचा थरार
मुंबई, 20 नोव्हेंबर, (हिं.स.) सलमान खान आणि नयनतारा यांचा आगामी चित्रपट ''मॉन्स्टर'' त्याच्या ॲक्शनमुळे चर्चेत आहे. दिग्दर्शक वामशी पेडिपल्ली या चित्रपटात फॅमिली ड्रामासोबतच मोठ्या लेव्हल ॲक्शन दाखवण्याच्या तयारीत आहेत. यासाठी निर्मात्यांनी सहा
'मॉन्स्टर'मध्ये सलमान आणि नयनतारा ही जोडी दाखवणार ताकद, ॲक्शनने सजणार चित्रपट.


मुंबई, 20 नोव्हेंबर, (हिं.स.) सलमान खान आणि नयनतारा यांचा आगामी चित्रपट 'मॉन्स्टर' त्याच्या ॲक्शनमुळे चर्चेत आहे. दिग्दर्शक वामशी पेडिपल्ली या चित्रपटात फॅमिली ड्रामासोबतच मोठ्या लेव्हल ॲक्शन दाखवण्याच्या तयारीत आहेत.

यासाठी निर्मात्यांनी सहा अनुभवी ॲक्शन कोरिओग्राफर आणि स्टंट तज्ञांची आंतरराष्ट्रीय टीम तयार केली आहे. व्हरायटी इंडियाच्या रिपोर्टनुसार, ही टीम सलमान आणि नयनताराच्या फाईट सिक्वेन्सला खास स्टाइल देण्याचं काम करेल.

या टीममध्ये दक्षिण कोरियाचे ॲक्शन डायरेक्टर आणि स्टंट कोऑर्डिनेटर ओ से-योंग यांचा समावेश आहे. त्याने 'वॉर', 'किल', 'धुरंधर: द रिव्हेंज', हॉलिवूड चित्रपट 'ॲव्हेंजर्स: एज ऑफ अल्ट्रान' आणि ऑस्कर विजेते 'पॅरासाइट' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांच्याशिवाय दक्षिण आफ्रिकेचे ॲक्शन डायरेक्टर क्रेग मॅकरे, थाई ॲक्शन एक्स्पर्ट केचा खामफाकडी आणि बल्गेरियन ॲक्शन डायरेक्टर कालोयन वोडेनिच्रोव्ह हे देखील या टीममध्ये आहेत.

भारतीय स्टंट तज्ज्ञ सुनील रॉड्रिग्ज आणि अनल अरासू यांच्यावरही चित्रपटाच्या ॲक्शनची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. सुनील रॉड्रिग्स 'ॲनिमल', 'किंग' आणि 'एक्स्ट्रॅक्शन' यांसारख्या चित्रपटांशी जोडले गेले आहेत, तर अनल अरासूच्या कामात 'महाराजा' आणि 'जन नायकन' यांचा समावेश आहे.

'मॉन्स्टर'मध्ये सलमान खान आणि नयनतारा ही जोडी पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहे. या चित्रपटात जॅकी श्रॉफ आणि अरविंद स्वामी देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. निर्माते तो हिंदी, तमिळ आणि तेलगू भाषांमध्ये प्रदर्शित करण्याच्या तयारीत आहेत. 2027 च्या ईदच्या मुहूर्तावर हा चित्रपट चित्रपटगृहात दाखल होईल.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande