रत्नागिरी : वेरळ घाटातील अपघातात दोघे जखमी
रत्नागिरी, 21 नोव्हेंबर, (हिं.स.) । मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वेरळ घाटात (ता. लांजा) आज दुपारी कार उलटल्याने झालेल्या अपघातात कारमधील दोघेजण जखमी झाले. मुंबईच्या दिशेने जात असलेली कार वेरळ घाटातील रम्बलिंग गतिरोधकावरून जात असताना अचानक घस
वेरळ अपघातातील मोटार


रत्नागिरी, 21 नोव्हेंबर, (हिं.स.) । मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वेरळ घाटात (ता. लांजा) आज दुपारी कार उलटल्याने झालेल्या अपघातात कारमधील दोघेजण जखमी झाले.

मुंबईच्या दिशेने जात असलेली कार वेरळ घाटातील रम्बलिंग गतिरोधकावरून जात असताना अचानक घसरली. चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार रस्त्यावर उलटली. आज दुपारी सुमारे १२.३० वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला.

अपघातग्रस्त कारचा क्रमांक MH 47 CD 1463 असून, उलटल्याने वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. कारमधील दोघांना अपघातात दुखापत झाली. त्यांना तातडीने लांजा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande