रत्नागिरी : कोकण महोत्सवात लोककला सादर करण्याचे आवाहन
रत्नागिरी, 21 नोव्हेंबर, (हिं.स.) । कोकणातील लोककला वृद्धिंगत व्हाव्यात, लोककलांचा प्रचार-प्रसार व्हावा आणि अशा लोककला जतन व्हाव्यात याकरिता चिपळूणमध्ये कोकण लोककला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात आपल्या लोककला सादर कराव्यात, असे आवाहन आयोज
रत्नागिरी : कोकण महोत्सवात लोककला सादर करण्याचे आवाहन


रत्नागिरी, 21 नोव्हेंबर, (हिं.स.) । कोकणातील लोककला वृद्धिंगत व्हाव्यात, लोककलांचा प्रचार-प्रसार व्हावा आणि अशा लोककला जतन व्हाव्यात याकरिता चिपळूणमध्ये कोकण लोककला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात आपल्या लोककला सादर कराव्यात, असे आवाहन आयोजकांतर्फे लोककला पथकांना करण्यात आले आहे.

ठरावीक लोककला सोडता अनेक चांगल्या लोककलांची माहिती कोकणातीलच काही भागांना नाही. त्यामुळे अशा गुणात्मक आणि त्या त्या भागाचा सांस्कृतिक प्रतिनिधित्व करणाऱ्या लोककलांना संधी देण्याचा मानस लोककला महोत्सव समितीने व्यक्त केला आहे.

ज्या कलाकारांना आपल्या लोककला सादर करायची असेल, अशा कलाकारांनी वा मंडळांनी आपले संस्थेची अथवा मंडळाची माहिती आयोजकांना द्यावी. याकरिता आपल्या लोककलांचे फोटो आणि व्हिडिओ संपर्क क्रमांकावर पाठवावेत. ज्या लोककलांची निवड होईल त्यांना १६ व १७ जानेवारी २०२७ या महोत्सवाच्या कालावधीत लोककला सादर करण्याची संधी दिली जाईल. याशिवाय अशा लोककलाकारांचा सत्कार आणि त्यांना यथोचित मानधन तसेच त्यांचा येण्याजाण्याचा प्रवास खर्चही दिला जाईल, अशी माहिती मुख्य आयोजक सतीश कदम, मकरंद भागवत व राजेंद्र कुमार शिंदे यांनी दिली.

लोककला कलाकारांनी ९८५०८६३२६२ / ९८२२६८८७७१ या क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande