जागतिक दिव्यांग दिनानिमित्त अलिबागमध्ये दृष्टिहीनांसाठी मोफत वैद्यकीय तपासणी शिबिर
रायगड, 21 नोव्हेंबर, (हिं.स.)। जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड (NAB) रायगड अॅक्टिव्हिटी सेंटर, अलिबाग यांच्या वतीने दृष्टिहीन व्यक्तींसाठी मोफत वैद्यकीय तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार, १ डिसेंबर २०२६
अलिबागमध्ये १ डिसेंबरला वैद्यकीय शिबिर


रायगड, 21 नोव्हेंबर, (हिं.स.)। जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड (NAB) रायगड अॅक्टिव्हिटी सेंटर, अलिबाग यांच्या वतीने दृष्टिहीन व्यक्तींसाठी मोफत वैद्यकीय तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार, १ डिसेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता कुरुळ येथील NAB रायगड अॅक्टिव्हिटी सेंटरमध्ये हे शिबिर होणार आहे.

दरवर्षी ३ डिसेंबर रोजी जागतिक दिव्यांग दिन साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून दृष्टिहीन व्यक्तींच्या आरोग्याची काळजी घेणे, त्यांच्या आरोग्यविषयक समस्या जाणून घेणे आणि त्यांना आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देणे या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

अलिबाग तालुक्यातील कुरुळ येथील आर.सी.एफ. कॉलनी, बी-१२/४ येथे हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. जिल्ह्यातील दृष्टिहीन मुले, मुली, महिला आणि पुरुष अशा सर्वांनी या मोफत वैद्यकीय तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी ८५५२८३७३८३ या क्रमांकावर संपर्क साधावा.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande