
रत्नागिरी, 21 नोव्हेंबर, (हिं.स.) । दापोली-मंडणगड राज्यमार्गावरील खेर्डी येथे आज सकाळी एसटी बस आणि दुचाकीच्या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. सुरेंद्र गोरिवले (वय सुमारे ४५ वर्षे, रा. काळकाई कोंड, दापोली) असे या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी ७.३० ते ८ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. मंडणगडहून दापोलीच्या दिशेने एक एसटी बस येत होती, तर त्याच वेळी सुरेंद्र गोरिवले आपल्या दुचाकीवरून दापोलीहून मंडणगडच्या दिशेने प्रवास करत होते. खेर्डी परिसरात समोरून आलेली दुचाकी थेट एसटी बसच्या मागील चाकाखाली गेल्याने हा अपघात घडला. अपघाताची तीव्रता इतकी मोठी होती की सुरेंद्र गोरिवले यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी केल. अपघात कसा घडला याचा तपास पोलीस करत आहेत.
अपघातामुळे दापोली-मंडणगड मार्गावरील वाहतूक काही काळ पूर्णपणे विस्कळीत झाली होती आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी घटनास्थळी आवश्यक कायदेशीर कार्यवाही पूर्ण केल्यानंतर या मार्गावरील वाहतूक पुन्हा सुरळित करण्यात आली.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी