सुरुवातीच्या व्यवहारादरम्यान सराफा बाजारात सोने-चांदीच्या दरात किरकोळ घसरण
नवी दिल्ली, 23 नोव्हेंबर (हिं.स.)। देशांतर्गत सराफा बाजारात आज सुरुवातीच्या व्यवहारादरम्यान सोने आणि चांदीच्या किमतीत किरकोळ घसरण झाल्याचे दिसून येत आहे. किमतींमध्ये बदल झाल्यामुळे आज देशातील बहुतांश सराफा बाजारांत २४ कॅरेट सोने प्रति १० ग्रॅम १ ला
Bullion Market Gold Silver


नवी दिल्ली, 23 नोव्हेंबर (हिं.स.)। देशांतर्गत सराफा बाजारात आज सुरुवातीच्या व्यवहारादरम्यान सोने आणि चांदीच्या किमतीत किरकोळ घसरण झाल्याचे दिसून येत आहे. किमतींमध्ये बदल झाल्यामुळे आज देशातील बहुतांश सराफा बाजारांत २४ कॅरेट सोने प्रति १० ग्रॅम १ लाख २५ हजार ७० रुपये ते १ लाख २५ हजार २२० रुपये या दरम्यान व्यवहार करत आहे. त्याचप्रमाणे २२ कॅरेट सोने प्रति १० ग्रॅम १ लाख १४ हजार ६४० रुपये ते १ लाख १४ हजार ७९० रुपये या दरम्यान विकले जात आहे. चांदीच्या दरातही प्रति किलोग्रॅम १०० रुपयांची किरकोळ घसरण झाल्यामुळे दिल्लीच्या सराफा बाजारात आज चांदीचा भाव १ लाख ७४ हजार ९०० रुपये प्रति किलोग्रॅम झाला आहे.

दिल्लीमध्ये आज २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १ लाख २५ हजार २२० रुपये असून, २२ कॅरेट सोन्याची किंमत १ लाख १४ हजार ७९० रुपये नोंदवण्यात आली आहे. तर देशाची आर्थिक राजधानी मुंबईमध्ये २४ कॅरेट सोने १ लाख २५ हजार ७० रुपये प्रति १० ग्रॅम आणि २२ कॅरेट सोने १ लाख १४ हजार ६४० रुपये प्रति १० ग्रॅम दराने विकले जात आहे. त्याचप्रमाणे अहमदाबादमध्ये २४ कॅरेट सोन्याचा किरकोळ भाव प्रति १० ग्रॅम १ लाख २५ हजार १२० रुपये, तर २२ कॅरेट सोन्याचा भाव १ लाख १४ हजार ६९० रुपये नोंदवण्यात आला आहे.

या प्रमुख शहरांव्यतिरिक्त चेन्नईमध्ये आज २४ कॅरेट सोने प्रति १० ग्रॅम १ लाख २५ हजार ७० रुपये आणि २२ कॅरेट सोने १ लाख १४ हजार ६४० रुपये दराने विकले जात आहे. त्याचप्रमाणे कोलकातामध्ये २४ कॅरेट सोन्याचा भाव १ लाख २५ हजार ७० रुपये, तर २२ कॅरेट सोन्याचा भाव १ लाख १४ हजार ६४० रुपये प्रति १० ग्रॅम आहे. भोपाळमध्ये २४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम १ लाख २५ हजार १२० रुपये असून, २२ कॅरेट सोने १ लाख १४ हजार ६९० रुपये दराने विकले जात आहे.

जयपूरमध्ये २४ कॅरेट सोने प्रति १० ग्रॅम १ लाख २५ हजार २२० रुपये आणि २२ कॅरेट सोने १ लाख १४ हजार ७९० रुपये दराने विकले जात आहे. पाटणा येथे २४ कॅरेट सोन्याची किंमत १ लाख २५ हजार १२० रुपये प्रति १० ग्रॅम असून, २२ कॅरेट सोन्याचा भाव १ लाख १४ हजार ६९० रुपये आहे. चंदीगडमध्ये २४ कॅरेट सोन्याचा भाव १ लाख २५ हजार २२० रुपये, तर २२ कॅरेट सोन्याचा भाव १ लाख १४ हजार ७९० रुपये प्रति १० ग्रॅम आहे. लखनौच्या सराफा बाजारातही आज २४ कॅरेट सोने १ लाख २५ हजार २२० रुपये आणि २२ कॅरेट सोने १ लाख १४ हजार ७९० रुपये प्रति १० ग्रॅम दराने विकले जात आहे.

देशातील इतर राज्यांप्रमाणेच कर्नाटक, तेलंगणा आणि ओडिशा येथील सराफा बाजारांतही आज सोन्याच्या दरात किरकोळ घसरण नोंदवण्यात आली आहे. या तिन्ही राज्यांच्या राजधानी असलेल्या बंगळुरू, हैदराबाद आणि भुवनेश्वर येथे आज २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १ लाख २५ हजार ७० रुपये आहे. त्याचप्रमाणे या तिन्ही शहरांतील सराफा बाजारांत २२ कॅरेट सोने १ लाख १४ हजार ६४० रुपये प्रति १० ग्रॅम दराने विकले जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande