बांगलादेश दौऱ्यातून दुखापतीमुळे वेगवान गोलंदाज कोएत्झी आणि म्फाका बाहेर
जोहान्सबर्ग, २६ नोव्हेंबर (हिं.स.) बांगलादेशच्या आगामी मर्यादित षटकांच्या दौऱ्यापूर्वी दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का बसला आहे. वेगवान गोलंदाज जेराल्ड कोएत्झी आणि क्वेना म्फाका यांना दुखापतीमुळे एकदिवसीय आणि टी-२० आंतरराष्ट्रीय संघातून वगळण्यात आले आह
जेराल्ड कोएत्झी


जोहान्सबर्ग, २६ नोव्हेंबर (हिं.स.) बांगलादेशच्या आगामी मर्यादित षटकांच्या दौऱ्यापूर्वी दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का बसला आहे. वेगवान गोलंदाज जेराल्ड कोएत्झी आणि क्वेना म्फाका यांना दुखापतीमुळे एकदिवसीय आणि टी-२० आंतरराष्ट्रीय संघातून वगळण्यात आले आहे.

नॉर्थ वेस्ट ड्रॅगन्सविरुद्धच्या प्रथम श्रेणी मालिकेत लायन्स संघाकडून खेळताना कोएत्झीला मांडीच्या स्नायूला दुखापत झाली. त्याची बांगलादेश दौऱ्याच्या एकदिवसीय आणि टी-२० आंतरराष्ट्रीय दोन्ही सामन्यांसाठी निवड झाली होती.

उजव्या हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीतून सावरत असलेल्या म्फाकाला सरावादरम्यान आणखी एक धक्का बसला. त्याला टी-२० आंतरराष्ट्रीय संघातून तसेच इंग्लंड लायन्सविरुद्धच्या मालिकेसाठी दक्षिण आफ्रिका 'अ' संघाच्या एकदिवसीय संघातून वगळण्यात आले आहे.

या बदलांमुळे टियान व्हॅन व्हुरेनला पहिल्यांदाच दक्षिण आफ्रिकेच्या एकदिवसीय संघात स्थान मिळाले आहे. इथन बॉश आणि कोणताही आंतरराष्ट्रीय अनुभव नसलेला वेगवान गोलंदाज जे. जे. बॅसन यांचा टी-२० आंतरराष्ट्रीय संघात समावेश करण्यात आला आहे.

याव्यतिरिक्त, इंग्लंड लायन्सविरुद्धच्या मालिकेसाठी दक्षिण आफ्रिका 'अ' संघात बयांडा मोझोला आणि ओकुहले सेले यांचा समावेश करण्यात आला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande