जिमी शेरगिल आणि प्रनूतन बहल यांच्या 'प्यादे' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित
मुंबई, २८ नोव्हेंबर (हिं.स.) — जिमी शेरगिल आणि प्रनूतन बहल यांची मुख्य भूमिका असलेला ''प्यादे'' या आगामी चित्रपटाचा ट्रेलर मुंबईत एका कार्यक्रमादरम्यान प्रदर्शित करण्यात आला. ''शायनिंग मून पिक्चर्स''च्या बॅनरखाली निर्मित या चित्रपटाच्या ट्रेल
जिम्मी


मुंबई, २८ नोव्हेंबर (हिं.स.) — जिमी शेरगिल आणि प्रनूतन बहल यांची मुख्य भूमिका असलेला 'प्यादे' या आगामी चित्रपटाचा ट्रेलर मुंबईत एका कार्यक्रमादरम्यान प्रदर्शित करण्यात आला. 'शायनिंग मून पिक्चर्स'च्या बॅनरखाली निर्मित या चित्रपटाच्या ट्रेलर लाँच सोहळ्याला मुख्य कलाकार, लेखक-दिग्दर्शक शेखर एस. झा आणि निर्मात्या रिंकू सिंग उपस्थित होते. ट्रेलरमध्ये चित्रपटातील पात्रे आणि त्यांच्या विश्वाची एक झलक पाहायला मिळते, मात्र कथानकातील अनेक पैलू अजूनही गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहेत.

ट्रेलरमध्ये जिमी शेरगिल नेहमीच्या प्रभावी शैलीत दिसत आहेत, तर प्रनूतन बहल आपल्या पात्राच्या माध्यमातून कथानकाला एक वेगळे परिमाण देतात. जिमी यांनी सांगितले की, 'प्यादे' हा त्यांच्यासाठी एक विशेष अनुभव होता, ज्यामध्ये त्यांना एका वेगळ्या प्रकारची भूमिका साकारण्याची संधी मिळाली. प्रनूतन यांनी जिमी यांच्यासोबत काम करण्याला एक मौल्यवान शिकण्याचा अनुभव असल्याचे म्हटले आणि सांगितले की, या भूमिकेमुळे त्यांना स्वतःच्या अभिनयाचे नवीन पैलू शोधण्याची संधी मिळाली.

दिग्दर्शक शेखर एस. झा यांनी सांगितले की, ही कथा त्यांच्या हृदयाच्या खूप जवळ आहे आणि ती पडद्यावर साकारणे हा एक महत्त्वपूर्ण अनुभव ठरला आहे. त्यांनी जिमी आणि प्रनूतन यांच्या अभिनयाचे कौतुक केले आणि संपूर्ण टीमचे आभार मानले. निर्मात्या रिंकू सिंग यांच्या मते, चित्रपट साकारण्यासाठी संपूर्ण टीमने अत्यंत समर्पण आणि उत्साहाने काम केले आहे. या ट्रेलरच्या प्रदर्शनामागचा उद्देश प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबद्दल उत्सुकता निर्माण करणे हा आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande