ऑगमॉन्टचे देशभर कॅम्पेन 'गोल्ड एसआईपी पे सिल्वर एसआईपी फ्री'
देशात पहिल्यांदाच अनोखी ऑफर; नव्या ''गोल्ड एसआयपी''वर तितक्याच ग्रॅमची ''सिल्वर एसआयपी'' मिळणार मोफत; १ वर्ष सलग गुंतवणूक करणे आवश्यक मुंबई, ४ नोव्हेंबर (हिं.स.) : भारतामधील पहिल्या क्रमांकाचा गोल्ड आणि सिल्वर प्लॅटफॉर्म असलेल्या ''ऑगमॉन्
ऑगमॉन्ट गोल्ड एसआईपी पे सिल्वर एसआईपी फ्री


* देशात पहिल्यांदाच अनोखी ऑफर; नव्या 'गोल्ड एसआयपी'वर तितक्याच ग्रॅमची 'सिल्वर एसआयपी' मिळणार मोफत; १ वर्ष सलग गुंतवणूक करणे आवश्यक

मुंबई, ४ नोव्हेंबर (हिं.स.) : भारतामधील पहिल्या क्रमांकाचा गोल्ड आणि सिल्वर प्लॅटफॉर्म असलेल्या 'ऑगमॉन्ट'ने संपूर्ण देशभरात 'गोल्ड एसआईपी पे सिल्वर एसआईपी फ्री' ही विशेष मोहीम सुरु केली आहे. या ऑफरमध्ये ग्राहकांना सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याची संधी मिळत आहे, आणि सोबतच त्यांना तितक्याच ग्रॅमची चांदी 'कॉम्प्लिमेंट्री सिल्वर एसआयपी'च्या माध्यमातून भेट म्हणून अगदी मोफत दिली जाईल.

सणासुदीच्या काळात मर्यादित वेळेसाठी आणलेल्या या विशेष ऑफर अंतर्गत, जे ग्राहक नोव्हेंबर २०२६ मध्ये नवीन 'गोल्ड एसआयपी' सुरू करतील, त्यांना तेवढ्याच ग्रॅमची 'सिल्वर एसआयपी' पूर्णपणे निःशुल्क मिळेल. यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार नाही. ही निःशुल्क सिल्वर एसआयपी ग्राहकांना तेव्हाच मिळेल, जेव्हा ते कोणत्याही ब्रेकशिवाय सलग एक वर्ष आपली गोल्ड एसआयपी पूर्ण करतील. ग्राहकांमध्ये सातत्याने गुंतवणूक करण्याची सवय निर्माण करणे, जेणेकरून ते प्रदीर्घ काळासाठी मौल्यवान धातूंमध्ये आपली गुंतवणूक सुरक्षित करू शकतील, हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.

या ऑफरची सुरुवात धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर करण्यात आली आहे, कारण हा काळ सोने खरेदीसाठी आणि नवीन गुंतवणुकीची सुरुवात करण्यासाठी वर्षातील सर्वात शुभ मानला जातो. या सणासुदीच्या काळात 'गोल्ड एसआयपी' सुरू करून ग्राहक आपली ही पूर्वापारपासून चालत आलेली परंपरा एका आधुनिक आणि शिस्तबद्ध पद्धतीने पुढे नेऊ शकतात. विशेष म्हणजे, या बचतीची सुरुवात रोज अवघ्या १० रुपयांपासून करता येऊ शकते.

ऑगमॉन्टच्या 'गोल्ड एसआयपी'च्या माध्यमातून ग्राहक दररोज, दर आठवड्याला किंवा महिन्याला थोडे-थोडे पैसे जमा करून २४ कॅरेट (९९९ शुद्धता) सोन्याची खरेदी करू शकतात. ग्राहक कधीही आणि कोठूनही ऑगमॉन्टच्या अधिकृत वेबसाईटवरून (augmont.com) किंवा मोबाईल ॲपवरून आपली गोल्ड एसआयपी सुरू करू शकतात. ग्राहकांनी खरेदी केलेल्या सोन्याच्या प्रत्येक ग्रॅमच्या बदल्यात पूर्णपणे सुरक्षित आणि विमा उतरवलेल्या तिजोऱ्यांमध्ये तितकेच प्रत्यक्ष सोने ठेवले जाते. अशा प्रकारे टप्प्याटप्प्याने गुंतवणूक केल्यामुळे सोन्याच्या बाजारातील चढ-उतारांचा धोकाही कमी होतो. ग्राहक त्यांच्या इच्छेनुसार आपले सोने कधीही ऑनलाईन विकू शकतात किंवा त्याचे सोन्याच्या नाण्यांमध्ये व दागिन्यांमध्ये रूपांतर करून ते थेट आपल्या घरपोच मागवू शकतात.

या कॅम्पेनच्या प्रसिद्धीसाठी देशभरात मोठ्या प्रमाणावर डिजिटल आणि पारंपरिक माध्यमांद्वारे जाहिराती केल्या जातील. ग्राहकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचण्यासाठी मल्टी-प्लॅटफॉर्म मोहीम पीवीआर आयनॉक्स चित्रपटगृहे, बरिस्ता आणि कॅफे कॉफी डे आउटलेट्स, मोठे होर्डिंग्स, रेल्वे स्थानके आणि ट्रेन यांसारख्या प्रमुख ठिकाणी राबवली जाईल. यासोबतच इंटरनेटवरही टार्गेट जाहिराती चालवल्या जातील.

या कॅम्पेनच्या माध्यमातून सोन्या-चांदीत गुंतवणूक करण्याची प्रक्रिया अधिक सोपी आणि सुलभ बनवण्याचा ऑगमॉन्टचा उद्देश आहे. तसेच, दीर्घकालीन बचतीचा भाग म्हणून ग्राहकांनी सोने आणि चांदी या दोन्ही पर्यायांचा विचार करावा, यासाठी कंपनी प्रोत्साहन देत आहे. सणासुदीच्या आणि लग्नसराईच्या काळाचा फायदा उठवणे हे देखील या उपक्रमाचे एक उद्दिष्ट आहे, कारण या काळात परंपरेचे पालन करत ग्राहक सोन्या-चांदीच्या खरेदीसाठी खूप उत्सुक असतात.

या मोहिमेद्वारे ऑगमॉन्टचे उद्दिष्ट लोकांना मौल्यवान धातूंमधील नियमित गुंतवणुकीबद्दल जागरूक करणे आणि डिजिटल गोल्ड व सिल्वर हे आजच्या काळात सर्वांसाठी गुंतवणुकीचे एक सोपे आणि सुरक्षित माध्यम बनले आहे, यावर विश्वास निर्माण करणे हे आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande