अमरावती येथील बाजार समिती पाच दिवस बंद
अमरावती, 06 नोव्हेंबर (हिं.स.)। दिवाळी सणानिमित्त कृषी उत्पन्न बाजार समिती शनिवार (ता. ७) ते बुधवार (ता. ११), असे सलग पाच दिवस बंद राहणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतमाल विक्री करताना मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागणार आहे. शेतमाल विक्री करण्याक
उद्यापासून बाजार समिती पाच दिवस बंद


अमरावती, 06 नोव्हेंबर (हिं.स.)। दिवाळी सणानिमित्त कृषी उत्पन्न बाजार समिती शनिवार (ता. ७) ते बुधवार (ता. ११), असे सलग पाच दिवस बंद राहणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतमाल विक्री करताना मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागणार आहे.

शेतमाल विक्री करण्याकरिता शेतकऱ्यांचे हक्काचे व्यासपीठ म्हणजे कृषी उत्पन्न बाजार समिती आहे. बाजार समितीच्या माध्यमातून अडते, दलालांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा शेतमाल विक्री केल्या जाते. त्यामुळे शेतकऱ्यांची सर्वाधिक भिस्त बाजार समितीवरच अवलंबून राहते. परंतु आगामी काळातील दिवाळी सणाच्या पार्श्वभूमिवर सलग चार दिवस बाजार समिती बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाच्या वतीने घेण्यात आला आहे.

यात प्रामुख्याने शनिवारी (ता. ७) बाजार समिती बंदच राहते. त्यानंतर खऱ्या अर्थाने दिवाळी सुरवात होणार आहे. दरवर्षी दिवाळीनिमित्त बाजार समित्या बंद ठेवण्यात येते. यंदा रविवारी (ता. ८) लक्ष्मीपुजन आहे. त्यानंतर बलिप्रतीपदा, भाऊबीज सारखे महत्त्वाचे सण आहे. त्यामुळे बुधवार (ता. ११) पर्यंत बाजार समिती बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता थेट गुरुवारी (ता. १२) सकाळी बाजार समितीचे दार उघडणार आहे. बंदच्या काळात शेतकऱ्यांनी शेतमाल विक्रीसाठी बाजार समितीत आणू नये, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

-----------------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande